Yuzvendra Chahal On Release From RCB: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल हा आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या संघासाठी त्याने दमदार कामगिरी केली आहे. या संघासाठी खेळण्यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करायचा.
आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक सामने तो याच संघाकडून खेळला आहे. मात्र या संघातून रिलीझ करण्याचा किस्सा सांगताना युझवेंद्र चहल भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
युझवेंद्र चहलने रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मला खूप वाईट वाटलं होतं, २०१४ मध्ये माझा प्रवास सुरु झाला होता. पहिल्याच सामान्यापासून विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवायला सुरुवात केली होती. मात्र हे खूप वाईट होतं. कारण मी ८ वर्षांपासुन या संघाचे प्रतिनिधित्व करत होतो. युझवेंद्र चहलने २०१४ पासून ते २०२१ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर रिलीज करण्यात आले होते.
एक कॉल देखील आला नाही..
तसेच तो पुढे म्हणाला की, ' मी लोकांना हे बोलताना ऐकलं की, युजीने जास्त पैसे घेतले असतील. मात्र असं काहीच नव्हतं. मी अनेक मुलाखतींमध्ये देखील सांगितलं आहे, की मी जास्तीची रक्कम मागितली नव्हती. मला चांगलंच माहित आहे की, मी किती रकमेचा हकदार आहे. यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मला एक कॉल देखील आला नव्हता. त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं.' (Latest sports updates)
तसेच तो पुढे म्हणाला की, ' मी आरसीबी संघासाठी १४० सामने खेळले. मात्र मला त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी मला वचन दिले होते की, माझ्यावर बोली लावून पुन्हा मला संघात स्थान देतील. मी म्हणालो ठीक आहे, त्यानंतर मी खूप रागावलो होतो. मी त्यांच्यासाठी ८ वर्ष खेळलो आहे. चिन्नास्वामी माझं आवडतं स्टेडियम आहे.' राजस्थान रॉयल्सने युझवेंद्र चहलला ६.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.