Political Bhaubeej: मुंडे, तटकरे, पेडणेकरांसह राजकीय नेत्यांनी साजरी केली भाऊबीज; पाहा खास क्षणांचे फोटो

Shruti Vilas Kadam

अमोल खताळ यांनी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज

संगमनेर येथे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबीयांसोबत उत्साहात भाऊबीज साजरी केली. बहिणीच्या प्रत्येक सुख-दुःखात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच भावाचे खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Political Bhaubeej

अनिल बोंडेंनी बहिणीला दिला धीर

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या शिक्षण नेत्या डॉ. संगीता शिंदे यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आपली प्रतिक्रिया दिली. खासदार अनिल बोंडे आणि त्यांच्या पत्नी वसुधा बोंडे यांनी संगीता शिंदे यांना धीर दिला.

Political Bhaubeej

पंकजा आणि धनंजय मुंडेंनी साजरी केली भाऊबीज

मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. धनंजय मुंडे यांनी बहिणीची भेट घेऊन भाऊबीजेचा सण साजरा केला.

Political Bhaubeej

आदिती आणि अनिकेत तटकरे यांची भाऊबीज

मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनीही भाऊबीज साजरी केली. सुतारवाडी येथील निवासस्थानी दोघांनी कुटुंबीयांसोबत हा सण साजरा केला.

Political Bhaubeej

ठाकरे कुटुंबियांनी एकत्रित साजरी केली भाऊबीज

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज बहिण जयजयवंती यांच्या दादर येथील निवासस्थानी भाऊबीज साजरी केली

Political Bhaubeej

सुप्रिया सुळेंची भाऊबीज चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार यांच्यातलं बहीण आणि भावाचं नातं हे राजकारणाच्या पलिकडचं होतं. मात्र जानेवारी महिन्यात अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ज्यानंतर पवार कुटुंबाने या वर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या शिवाय असलेली ही पहिलीच भाऊबीज असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Political Bhaubeej

किशोरी पेडणेकर यांनी हनुमानाला ओवाळून साजरी केली भाऊबीज

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. त्यांनी हनुमानाची आरती करून त्यांना ओवाळले. त्यांच्या या अनोख्या भाऊबीजेची सध्या चर्चा होत आहे.

Political Bhaubeej

Diwali Fatigue: दिवाळीच्या धावपळीमुळे जाणवतोय थकवा आणि आळस? मग घरीच करा हे ७ सोपे उपाय!

Diwali Fatigue | Saam Tv
येथे क्लिक करा