Harbhajan Singh vs Sreesanth saam tv
Sports

IPL 2025: मी पण माणूस आहे, देव नाही...! हरभजनला आठवला 'थप्पड कांड', 17 वर्षांनी मागितली श्रीसंतची माफी

Harbhajan Singh vs Sreesanth: हरभजन सिंग आणि एस. श्रीसंत यांच्यातील 'थप्पड प्रकरणा'नंतर १७ वर्षांनी माजी भारतीय फिरकीपटूने त्या दिवशीच्या आपल्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेटमध्ये वादविवाद हे होतच असतात. आयपीएल देखील याला अपवाद नाही. आयपीएलमध्ये १७ वर्षांपूर्वी गाजलेला थप्पड कांड अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंह आणि एस श्रीसंत यांच्यामध्ये ही वादाची ठिणगी पडली होती. तर आता तब्बल १७ वर्षांनंतर हरभजनला त्याची चूक उमगली असून त्याने माफी मागितली आहे.

हरभजन सिंग आणि एस. श्रीसंत यांच्यातील प्रसिद्ध 'थप्पड कांड'नंतर १७ वर्षांनी माजी भारतीय ऑफ-स्पिनरने त्या दिवशीच्या त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. हरभजन आयपीएल दरम्यान समालोचन टीमचा भाग आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये त्याने पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला कानशि‍लात लगावली होती. यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. इतकंच नाही तर त्यांच्या बंदीही घालण्यात आली होती.

हरभजनने मागितली माफी

१७ वर्षांपूर्वी घडलेल्या या थप्पड कांडचा व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल Pene लागला. जेव्हा चाहत्यांनी हरभजनला टॅग केलं तेव्हा अनुभवी फिरकी गोलंदाजाने ते त्याच्या अकाउंटवर पोस्ट केलं. यावेळी त्या दिवशीच्या त्याच्या वागण्याबद्दल त्याने केलेली चूक मान्य केली. हरभजनने लिहिलंय, "हे बरोबर नव्हतं. ही माझी चूक होती. मी असं करायला नको होतं. मी चूक केली, मी माणूस आहे, देव नाही" असं म्हणत त्या दिवशी माझ्या कृत्याबद्दल माफी मागितली.

वादानंतर रडू लागलेला श्रीसंत

'थप्पड कांड' ही आयपीएलच्या पहिल्या सिझनमधील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक होती. कानशि‍लात लगावल्यानंतर त्या सामन्यात भर मैदानात श्रीसंत रडू लागला होता. मग कुमार संगकारांसारख्या टीममधील खेळाडूंनी त्याला शांत केलं. त्या सामन्यात हरभजन मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्याच्यावर उर्वरित स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली होती. त्या दिवशीच्या घटनेबद्दल त्याने श्रीशांतची अनेक वेळा माफी मागितली आहे.

दोघांमधील संबंध आता सुधारले

श्रीसंत आणि हरभजनमधील संबंध आता चांगले आहेत. श्रीसंतने देखील अनेकदा स्पष्ट केलंय की, त्याला हरभजनबद्दल खूप आदर आहे. श्रीशांतनेही या वादात आपली भूमिका स्वीकारली होती. तो अधिक आक्रमक झाला होता असं त्याने म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT