indian test team twitter
क्रीडा

WTC Final Scenario : टीम इंडियासमोरचा मार्ग काटेरी, पण अशक्य नाही! 'असं' असेल WTC फायनलचं समीकरण!

Team India qualification Scenario for WTC Final : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर आता पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. तसं झालं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या आशा मावळतील का? कसं असेल पुढील समीकरण, वाचा.

Nandkumar Joshi

india vs new zealand 2nd test highlights : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया दुप्पट आत्मविश्वासानं न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानात उतरली. हाच दुप्पट आत्मविश्वास अतिआत्मविश्वासात बदलला आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाविरोधात ऐनवेळी कच खाल्ली. टीम इंडियाला पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. आता हा दुसरा कसोटी सामना गमावला तर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर पडण्याची नामुष्की ओढवू शकते. टीम इंडियाचा पुढचा मार्ग काटेरी जरी असला तरी, अशक्य असं काहीच नाही. पण त्यासाठी उरलेल्या सामन्यांत तशी दमदार कामगिरी करावी लागेल.

दुसऱ्या कसोटीत अश्विन आणि सुंदरनं अप्रतिम गोलंदाजी केली. न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. पहिल्या डावात २५९ धावांत गुंडाळता आलं. पण फलंदाजीला आलेल्या रोहित ब्रिगेडला साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा, विराट कोहली हे अनुभवी धुरंधर तर ढेपाळलेच, पण नवखेही चमक दाखवू शकले नाहीत. अवघ्या १५६ धावांत खुर्दा झाला. न्यूझीलंडकडे ३०१ धावांची आघाडी आहे. अजून पाच फलंदाज शिल्लक आहेत. टीम इंडिया बॅकफूटवर आहे. जर दुसरा कसोटी सामना गमावला तर, २०१२ नंतर पहिल्यांदाच भारतावर मायभूमीत मालिका गमवावी लागू शकते.

WTC मध्ये टीम इंडिया कुठे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या शर्यतीत सध्या भारतीय संघ ६८.०६ (पॉइंट्स पर्सेंटेज सिस्टम) टक्क्यांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर श्रीलंका तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी फायनलच्या शर्यतीत टीम इंडिया आघाडीवर होती. बेंगळुरूतील पहिली कसोटी गमावल्यानंतर आता पुण्यातील दुसऱ्या कसोटीत जोरदार धक्का बसू शकतो. त्यामुळं डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत मोठे अडथळे तयार झाले आहेत.

रोहित ब्रिगेडला आता काय करावं लागेल?

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमावला तर, भारतीय संघाची ६२.८२ टक्क्यांवर (PCT) घसरण होईल. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध अजून एक कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. आता या सहा सामन्यांपैकी रोहित ब्रिगेडला किमान चार सामने जिंकावे लागणार आहेत. तरच भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचू शकेल.

पुढचा मार्ग खडतर

भारतीय संघ पुढच्या सहा सामन्यांतील चार सामने जिंकू शकला नाही तर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक खडतर होणार आहे. कारण संघाला इतर प्रतिस्पर्ध्यांच्या कसोटी मालिकांच्या निकालांवर अबलंबून राहावं लागणार आहे. सध्या श्रीलंका हा संघ या शर्यतीत आहे. श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. त्या सामन्यांचे निकाल भारताचा मार्ग ठरवू शकतात.

टीम इंडियाचा मार्ग असा होणार प्रशस्त

क्रिकेट जाणकारांच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं गमावला तर, सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा टीम इंडियाचा मार्ग काटेरी होणार आहे. तर न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना गमावला तर, टीम इंडियाला उरलेल्या सहा कसोटी सामन्यांपैकी चार सामने जिंकावे लागतील. दुसरं म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. तसेच ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघाचा ३-२ ने पराभव करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीची फिल्डिंग; वरळीचं राजकीय गणित कसंय? पाहा व्हिडिओ

Congress CEC Meeting: जागावाटपातील वाटाघाटीवर राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज; CEC बैठकीत सुनावलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत शरद पवारच 'चाणक्य'; सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT