team india google
क्रीडा

Team India 2023: टीम इंडियासाठी कसं राहिलं २०२३ वर्ष? BCCI ने शेअर केला खास Video

Team India Record In 2023: हे वर्ष भारतीय संघासाठी कसं होतं,याचा बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे

Ankush Dhavre

BCCI Video On Indian Cricket Team:

किनाऱ्यावर येऊन नाव बुडणं हे भारतीय संघाने खूप जवळून पाहिलं. अंतिम फेरीत जायचं आणि पराभूत व्हायचं असंच काहीतरी २०२३ मध्ये पाहायला मिळालं. वर्ष संपलंय आता नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे.

दरम्यान हे वर्ष भारतीय संघासाठी कसं होतं,याचा बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय संघाचे विजय, पराभव आणि यावर्षातील न विसरता येणारे क्षण दाखवण्यात आले आहेत.

वर्षाची सुरुवात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी -२० मालिकेतून केली होती. या मालिकेत भारतीय संघाने २- १ ने बाजी मारली होती. त्यानंतर महिलांच्या अंडर १९ संघाने अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर कब्जा केला. बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकरी देखील प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत पराभव..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार खेळ केला.

भारतीय संघाने सुरुवातीचे सर्व १० सामने जिंकले. मात्र फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. भारतीय संघाला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं.

वर्ल्डकपपूर्वी आशिया कप स्पर्धेचा थरार पार पडला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. तर याच वर्षी जूनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यातही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT