Commentators Salary saam tv
Sports

Commentators Salary: समालोचक एका सामन्याचे किती पैसे घेतात? पाहा टॉप -५ प्रसिद्ध समालोचकांची यादी...

Salary Of Commentators: या लेखातून तुम्हाला भारतातील टॉप -५ प्रसिद्ध समालोचकांबद्दल माहिती देणार आहोत, जे सर्वाधिक पैसा कमवतात.

Ankush Dhavre

How Much Commentators Charge For 1 Match: फुटबॉल नंतर क्रिकेट हा जगातील सर्वात आवडता खेळ आहे. भारतात तर या खेळाने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले आहेत. कारण भारतात क्रिकेटला खेळ नव्हे तर धर्म मानले जाते.

मात्र लाईव्ह सामना पाहताना केवळ चौकार आणि षटकार नव्हे तर समालोचक देखील सामन्याची शोभा वाढवत असतात. समालोचकांशिवाय सामना खूप बोरिंग वाटतो.

आज आम्ही या लेखातून तुम्हाला भारतातील टॉप -५ प्रसिद्ध समालोचकांबद्दल माहिती देणार आहोत, जे सर्वाधिक पैसा कमवतात.

१) जतीन सप्रू (Jatin sapru) :

जतीन सप्रूला तुम्ही अनेकदा समालोचन करताना पाहिलं असेल. आयपीएल स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिकांमध्ये तो समालोचन करताना दिसून येत असतो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार त्याला एका क्रिकेट सामन्यात समालोचन करण्यासाठी साधारणतः १ ते दीड लाख रुपये मिळतात.

२)आकाश चोप्रा ( Aakash Chopra) :

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या समालोचनाचे लाखो फॅन्स आहेत. त्याच्या समालोचनात एक वेगळीच जादू आहे. हिंदी भाषेत समालोचन करताना तो मुहावरे आणि म्हणींचा वापर करत असतो. मिळालेल्या माहितीनुसार तो एका मालिकेत समालोचन करण्यासाठी तब्बल ३५ ते ४० लाख रुपये घेतो. तर एका सामन्यात समालोचन करण्यासाठी तो २ लाख रुपये घेतो.

३) सुनील गावस्कर (Sunil gavaskar) :

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी फलंदाजी करताना अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सुनील गावस्करांच्या समालोचनात देखील वेगळीच जादू आहे. हेच कारण आहे की,सुनील गावस्कर समालोचन करत असताना प्रेक्षकांना सामना पाहताना कधीही बोर होत नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना प्रत्येक सामन्यात समालोचन करण्यासाठी ५ लाख रुपये मिळतात.

४) हर्षा भोगले (Harsha bhogle) :

क्रिकेटची उत्तम जाण असलेले हर्षा भोगले हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत समालोचन करत असतात. हर्षा भोगले यांना समनालोचन करण्यासाठी प्रत्येक सामन्यात ५ लाख रुपये दिले जातात.

५) संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) :

भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर देखील भारतातील प्रसिद्ध समालोचकांपैकी एक आहेत. आयपीएल स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्ये देखील संजय मांजरेकर समालोचन करताना दिसून येत असतात. मिळालेल्या माहितीनुसार संजय मांजरेकर प्रत्येक सामन्यात समालोचन करण्यासाठी ३-५ लाख रुपये मानधन घेतात. (Latest sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT