India Hockey Asia Cup 2025 PTI
Sports

Hockey Asia Cup 2025 : भारताची कमाल, चीननंतर जपानचीही धूळधाण, दुसऱ्यांदा विजयाला गवसणी

india vs japan, Hockey Asia Cup 2025 : भारतीय हॉकी संघानं पहिल्या सामन्यात चीनला ४-३ ने पराभूत केलं होतं. आता जपानला नमवून आशिया कपमध्ये विजयी मालिका सुरूच ठेवली आहे.

Nandkumar Joshi

आशिया कप २०२५ मध्ये भारतीय हॉकी संघानं जबरदस्त कामगिरी केली आहे. बिहारच्या राजगीरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पूल ए गटातील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. या स्पर्धेची सुरुवात चीनविरुद्धच्या विजयाने झाली. आता जपानवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजयाला गवसणी घातली आहे. भारतानं हा सामना ३-२ अशा गुणफरकाने जिंकला. अर्थात चीननंतर जपान संघानंही भारताला तगडी टक्कर दिली.

राजगीरमध्ये रविवारी (३१ ऑगस्ट) पूल ए गटात भारत विरुद्ध जपान यांच्यात लढत झाली. या गटात भारतासमोर जपानचं मोठं आव्हान होतं. प्रत्यक्ष सामन्यात ते दिसून आलं. जपाननं भारताला तगडी टक्कर दिली. भारतानं सुरुवातीला कमालीचा आक्रमक खेळ केला. पाच मिनिटांच्या आतच जपानवर २-० अशी आघाडी घेतली. मनदीप सिंगने चौथ्या मिनिटाला पहिला गोल डागला. तर कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं पाचव्या मिनिटाला दुसरा गोल डागून आघाडी घेतली.

मात्र, त्यानंतर सामन्यातील चुरस वाढली. जपाननं चिवट खेळ केला. भारतीय संघानंही अनेक संधी गमावून पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. पहिल्या हाफपर्यंत गुणफलक २-० राहिला. भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपाननं जोरदार कमबॅक केलं. ३८ व्या मिनिटाला कोसी कवाबीने गोल डागून गुणफलक २-१ केला. भारतानं तिसऱ्या गोलसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर ४६ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पॅनल्टी कॉर्नरवर भारताला तिसरा गोल करून दिला. भारतानं विजयाच्या दिशेने पाऊल टाकलं होतं.

मात्र, त्यानंतर जपाननं भारतीय खेळाडूंना झुंजवलं. ५९ व्या मिनिटाला कवाबीनं गोल डागून जपानच्या आशा पल्लवित केल्या. पण भारतीय संघानं अखेरच्या काही मिनिटांत जपानला रोखलं आणि विजयाला गवसणी घातली. सलग दुसऱ्या विजयासह गटात भारतीय संघ अव्वल स्थानी विराजमान झाला.

या विजयासह सुपर ४ मध्ये भारतानं स्थान मिळवलं आहे. याआधी भारतीय संघानं चीनवर ४-३ ने मात केली. त्या सामन्यातही कर्णधार हरमनप्रीत सिंग विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने तीन गोल डागले होते. आता भारताचा अखेरचा सामना कझाकस्तानविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chameleon: सरडा एका दिवसात किती वेळा रंग बदलतो?

Today Horoscope : नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात मिळणार यश; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Maharashtra Live News Update: यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजेच्या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Face Care Tips: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी सकाळी उठल्यावर चेहरा या घरातील सामग्रीने करा स्वच्छ, आठवड्याभरात दिसेल फरक

Cricket Shocking : क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; टीम इंडियाच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT