Hardik Pandya T20 World Cup Trophy: ANI
Sports

Hardik Pandya: हिटमॅन रोहितने मुंबई विमानतळावर जिंकली सर्वांचे मनं; हार्दिकला दिला मोठा मान

Hardik Pandya T20 World Cup Trophy: मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडियाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी रोहित शर्माने केलेल्या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.

Bharat Jadhav

बार्बाडोसवरुन आल्यानंतर टीम इंडिया दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर भारतीय संघ मुंबईत दाखल झाला. टीम इंडियाचे खेळाडू काही मिनिटांपूर्वीच मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी चाहत्यांनी खेळाडूंचं जंगी स्वागत केलं. यावेळेस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केलेल्या एका कृतीमुळे त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. चाहत्याना परत एकदा रोहितच्या मनाचा मोठेपणा पाहायला मिळाला.

टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळातून एकामागून एक येत होते. त्यावेळी रोहित शर्माकडे वर्ल्ड कप ट्रॉफी असणार, हे सर्वांना अपेक्षित होतं. मात्र रोहितने टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी दिली. कॅप्टन रोहितच्या या मनाच्या मोठेपणासाठी त्याचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक केलं जातंय.

टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर स्वागतानंतर वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. टीम इंडियाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी विमानतळ ते मरीन ड्राईव्ह दरम्यान तोबा गर्दी केली होती. दरम्यान हार्दिक पंड्याने मुंबईत येण्याआधी एक फोटो शेअर केला होता. त्यात तो टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत आहे. हार्दिकने हा फोटो एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ‘सी यू सून, वानखेडे”, असं कॅप्शन हार्दिकने या फोटोला दिलं होतं.

विजयी रॅली वानखेडे मैदानावर पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी ढोल ताशांवर ठेरा धरल. विराट कोहली आणि रोहित शर्मा डान्स केला. या दोघांना पाहून संपूर्ण संघ नाचायला लागलाय.

वर्ल्ड कप खेळणारा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT