Rohit Sharma Saam Tv
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या इतिहासात हिटमॅन रोहित शर्माचा मोठा विक्रम; धोनीचा विक्रमही मोडला

Rohit Sharma: वर्ल्ड कपच्या इतिहासात मोठा विक्रम केलाय. त्यामुळे क्रिकेटच्या जगात त्यांचे नाव सन्मानाने घेतलं जाईल.

Bharat Jadhav

Rohit Sharma Record :

यंदाच्या वर्ल्ड कपनंतर हिटमॅन रोहित शर्माचं नाव नक्कीच आदरानं घेतलं जाईल. पुढील येणाऱ्या अनेक वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नाव जाप केला जाईल. त्याला कारण ठरली आज झालेली बांगलादेश विरुद्धात झाला सामना. पुण्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.(Latest News)

अवघ्या ४८ धावांची खेळी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांची जोरदार पिटाई केली. बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने वादळी सुरुवात केली. रोहितने या सामन्यात ४८ धावा केल्या, या धावा करताना त्याने अनेक विक्रम मोडले. त्याचा सारखा विक्रम गातील एकाही फलंदाजाला ही गोष्ट जमलेला नाही. यामध्ये माजी कर्णधार एमएस धोनी याच्या विक्रमाचाही समावेश आहे.

रोहित शर्माचा हा वर्ल्ड कपमधला सलग तिसरा सामना आहे जेव्हा त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली. रोहित शर्माची या वर्ल्ड कपची सुरुवात चांगली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ८६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यानंतर आता वर्ल्ड कपच्या चौथ्या सामन्यात रोहितने बांगलादेशच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात त्याने वर्ल्ड कपच्या इतिहासातील एक मोठा विक्रम आपल्या नाववर केला.

धोनीचा विक्रम मोडला

वर्ल्डकपच्या एका हंगमात कर्णधार असताना सर्वाधिक धावा करण्याचा धोनीचा विक्रम आज रोहित शर्माने मोडला. बांगलादेशच्या विरोधात पुण्यात २५ धावा करताच रोहितने धोनीचा मोठा विक्रम मोडला. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने २००१ च्या वर्ल्डकपमध्ये २४१ धावा केल्या होत्या. तर २०१५ मध्ये २३७ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने बांगलादेशविरोधात २५ धावा करताच धोनीचा हा विक्रम मोडला.

कमी डावात ठोकल्या सर्वाधिक धावा

तर या सामन्यात दमदार कामगिरी करत रोहितने वर्ल्ड कपमध्ये फक्त २१ डावांत १२०० धावांचा पल्ला ओलांडला. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम हा भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ४४ सामन्यांत २२७८ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग आहे. रिकीने २७४३ धावा केल्या होत्या.

यासाठी त्याला ४३ सामने खेळावे लागले होते. वर्ल्ड कपच्या या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आहे. त्याने ३५ सामन्यात १५३२ धावा केल्या होत्या. रोहितने या तिघांपेक्षा कमी सामन्यांमध्ये १२०० धावांचा टप्पा गाठला आणि तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT