HONG KONG CRICKET TEAM TWITTER
क्रीडा

Hong Kong T20 Cricket: टी-20 सामन्याचा निकाल अवघ्या 10 चेंडूत लागला , ICC च्या स्पर्धेत घडला विक्रम!

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप एशिया क्वालिफायर स्पर्धेतील सामने सुरु आहेत. या स्पर्धेतील सामन्यात हाँगकाँग आणि मंगोलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना कुठलाही सामना कुठलाही क्रिकेट फॅन विसरु शकणार नाही.

टी-२० क्रिकेटमध्ये क्रिकेट फॅन्सला झटपट क्रिकेट पाहण्याची संधी मिळते, मात्र इतकं झटपट क्रिकेट तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल. टी-२० क्रिकेटमधील या सामन्याचा निकाल अवघ्या १० चेंडूत लागला आहे.

या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मंगोलिया संघाचा डाव अवघ्या १७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँग संघाने अवघ्या १० चेंडूत सामना जिंकला. मंगोलियाचा संघ कमी धावांवर गारद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील या संघाचा डाव अवघ्या १२ धावांवर आटोपला होता.

फलंदाजांचा फ्लॉप शो

या सामन्यात मंगोलियाच्या फलंदाजांकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या संघातील ४ खेळाडूंना खातंही उघडता आलं नाही. या डावात ५ धावा करणारा फलंदाज हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर संघातील ४ फलंदाजांना खातंही उघडता आलेलं नाही. यासह ३ खेळाडूंना प्रत्येकी १ आणि ३ खेळाडूंना प्रत्येकी २ धावा करता आल्या.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मंगोलिया संघाने अवघ्या १७ धावा करण्यासाठी १४.२ षटक फलंदाजी केली. हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय हाँगकाँगच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. हाँगकाँग धारदार गोलंदाजीसमोर मंगोलियाचे फलंदाज गुडघे टेकताना दिसून आले.

हाँगकाँग संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १८ धावा करायच्या होत्या. हे आव्हान हाँगकाँगने ९ गडी राखून आणि १० चेंडू खेळून पूर्ण केलं. या सामन्यात आयुष शुक्लाने शानदार गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात एकूण ४ षटकं टाकली. ही चारही षटकं निर्धाव होती. यादरम्यान त्याला १ गडी बाद करण्यात यश आलं. या सामन्याची आता जगभर चर्चा सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

SCROLL FOR NEXT