team india twitter
Sports

IND vs AUS 1st Test: भारताचा पर्थमध्ये एकतर्फी विजय! बुमराह, जयस्वालसह हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

Heroes Of India vs Australia 1st Test Win: भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेला भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

भारताला विजय मिळवून देण्यात यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाची भूमिका बजावली. यासह आणखी काही खेळाडू होते, ज्यांनी हा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. कोण आहेत भारतीय संघाच्या विजयाचे हिरो? जाणून घ्या.

जसप्रीत बुमराह -

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर आटोपला होता. इथून भारतीय संघ कमबॅक करेल, असं वाटलं नव्हतं. मात्र बुमराहने गोलंदाजीत कमाल कामगिरी केली.

त्याने गोलंदाजी करताना अवघ्या ३० धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. या सामन्यात त्याने कर्णधार म्हणूनही दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात ५ गडी बाद केल्यानंतर दुसऱ्या डावातही त्याची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली.

यशस्वी जयस्वाल

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर आटोपला होता. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जयस्वालने डावाची सुरुवात करताना केएल राहुलसोबत २०१ धावांची भागीदारी केली. यासह वैयक्तिक १६१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली.

केएल राहुल-

पर्थ कसोटीतील पहिल्या डावात जेव्हा विकेट्सची रांग लागली होती. त्यावेळी केएल राहुलने २६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने जयस्वालसोबत मिळून २०१ धावांची भागीदारी केली. त्याने दुसऱ्या डावात ७७ धावा केल्या.

विराट कोहली

विराट कोहली हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. पहिल्या डावात ५ धावांवर बाद झाल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केलं. त्याने या डावात १०० धावांची शानदार शतकी खेळी केली.

नितीश कुमार रेड्डी

आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी महत्वाची खेळी केली. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४१ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने ३८ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT