virat kohli twitter
Sports

Virat Kohli Viral Video: एकटा विराट ऑस्ट्रेलियन फॅन्सला भिडला! पॅव्हेलियनमध्ये जाताना जोरदार राडा, पाहा VIDEO

Virat Kohli Fight Video: चौथ्या कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात विराट कोहली ३६ धावा करत माघारी परतला. दरम्यान बाद होऊन माघारी जात असताना जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

बॉक्सिंग डे कसोटी सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कमी आणि विराट विरुद्ध ऑस्ट्रेलियन फॅन्स असाच काहीसा दिसून येतोय. मेलबर्नच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात विराट कोहली आपल्या फलंदाजीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

दरम्यान सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट जेव्हा बाद होऊन मैदानाबाहेर जात होता, त्यावेळी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फॅन्स यांच्यात बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

विराट बाद होताच पेटला वाद

मेलबर्न कसोटीतील पहिल्या डावात विराटला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला ३६ धावांवर बाद होऊन माघारी परतावं लागलं. दरम्यान बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असताना, ऑस्ट्रेलियन फॅन्स जोरदार हुटींग करताना दिसून आले.

विराट आत गेलाच होता, इतक्यात ऑस्ट्रेलियन फॅन असं काहीतरी म्हणाला जे विराटच्या मनाला लागलं. विराट लगेच बाहेर आला आणि त्या फॅनला उत्तर दिलं. शेवटी सेक्युरिटी गार्डने हा वाद मिटवला आणि मग विराट आत गेला.

विराट - कॉन्टास वाद

या सामन्यातील पहिल्या दिवसापासून विराट कोहली जोरदार चर्चेत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्टासला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली.

दरम्यान विराटने त्याला धक्का दिला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर आयसीसीने विराटवर कारवाई करत, त्याच्या मॅच फीवर २० टक्के दंड आकारला आणि १ डिमेरीट पॉईंटही दिला. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन फॅन्स विराटच्या विरोधात नारे देताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे भारतीय फॅन्स विराटला समर्थन करताना दिसून येत आहेत.

विराटने पुन्हा तिच चूक केली

विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरतोय. तो ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद होतोय. मात्र या सामन्यात त्याने बाहेर जाणारे चेंडू सोडण्याचा निश्चय केला होता. त्याचा हा प्लान सक्सेसफुल ठरत होता. मात्र पुन्हा एकदा त्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेड काढली. त्यामुळे त्याला झेलबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पदवीधर आमदार धीरज लिंगडे यांच्याकडूनच आदर्श आचारसंहितेचा भंग

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Pune News: पुण्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, पार्थ पवारांना अडचणीत आणणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण?

Samsung Galaxy S24 Ultra वर मेगा डिस्काउंट, फ्लिपकार्टवर तब्बल हजारोंची मोठी सूट

Ladki Bahin Yojana: ६ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; आदिती तटकरेंनी कारणच सांगितलं

SCROLL FOR NEXT