Virat Kohli Viral Video: विराटचा क्रेझी फॅन! मैदानात घुसला अन् खांद्यावर हात ठेवत फोटोही काढला, पाहा VIDEO

Fan Invades In IND vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत एक फॅन मैदानात आल्याचे पाहायला मिळाले आहे.
Virat Kohli Viral Video: विराटचा क्रेझी फॅन! मैदानात घुसला अन् खांद्यावर हात ठेवत फोटोही काढला, पाहा VIDEO
virat kohlitwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी मेलबर्न मैदानाच्या सेक्युरिटी गार्ड्सकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सामना सुरु असताना एक फॅन स्टँड्समधून उडी मारुन मैदानात आला आणि त्यानंतर रोहित आणि विराटच्या जवळ जाऊन उभा राहिला.

Virat Kohli Viral Video: विराटचा क्रेझी फॅन! मैदानात घुसला अन् खांद्यावर हात ठेवत फोटोही काढला, पाहा VIDEO
IND vs AUS: विराटचं चुकलंच पण खेळाडूच्या तोंडावर कोण थुंकलं होतं? कोहलीला जोकर दाखवल्यावर ऑस्ट्रेलियन मीडियावर संतापले पठाण-गावस्कर

मैदानात घुसखोरी करणाऱ्या फॅनने आधी रोहितची भेट घेतली. त्यानंतर विराटजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो क्लिक केला. विराटची भेट घेताच, सेक्युरिटी गार्ड्स मैदानात धावून आले आणि घुसखोरी करणाऱ्याला मैदानाच्या बाहेर नेलं. या घटनेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Virat Kohli Viral Video: विराटचा क्रेझी फॅन! मैदानात घुसला अन् खांद्यावर हात ठेवत फोटोही काढला, पाहा VIDEO
IND vs AUS: नॉर्मल वाटलोय का? भारताला नडणाऱ्या हेडची, बुमराहने केली दांडी गुल- VIDEO

नेमकं काय घडलं?

या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी ९७ वे षटक सुरु होते. हे षटक सुरु असताना, एका फॅनने सेक्युरिटी गार्ड्सला चकवा देत मैदानात प्रवेश केला. मैदानात प्रवेश केल्यांतर आधी तो रोहितच्या दिशेने जात होता.

मात्र त्यानंतर त्याने विराटच्या दिशेने धाव घेतली. हा व्यक्ती नेमका कोण? हे अजूनही कळू शकलेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार, हा तोच व्यक्ती आहे, ज्याने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनल सुरु असताना, मैदानात प्रवेश केला होता.

ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत

बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४७४ धावांचा डोंगर उभारला आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक ठरले.

यासह त्याचे भारतीय संघाविरुद्ध झळकावलेले ११ वे शतक ठरले आहे. इतर फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर सॅम कॉन्टासने शानदार ६० धावांची खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ आणि मार्नस लाबुशेनने ७२ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com