Harry Brook saam tv
क्रीडा

Harry Brook: पाकिस्तानची धुलाई करत हॅरी ब्रूकने ठोकलं त्रिशतक; जो रूटसह 90 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही मोडला

Surabhi Jagdish

इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे. या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने मोठी कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत ब्रूकने थेट ट्रिपल सेंच्युरी झळकावली आहे. हॅरी ब्रूक टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा इंग्लंडचा सहावा फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने टॉल जिंकत प्रथम फलंदाजी केली.यावेळी पाकिस्तानच्या टीमने ५५६ रन्स चोपल्यानंतर निर्धास्त झालेल्या पाकिस्तानची जो रूट आणि हॅरी ब्रूक या जोडीने झोप उडवली. जो रूट ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ रन्सची खेळी केली. मात्र यानंतर तो बाद झाला. मात्र हॅरी ब्रूकने त्याचा आक्रामक खेळ सुरुच ठेवला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ब्रूकने टेस्टमधील त्याच्या पहिल्या द्विशतकाचं त्रिशतकात रुपांतर केलं.

जो रूटसह ९० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

पहिल्या टेस्ट सामन्यात रूट आणि ब्रूक ही जोडी चांगलीच जमली होती. रूट आणि ब्रूक या जोडीने ५५२ चेंडूंत ४५४ धावांची विक्रमी पार्टनरशिप केली आहे. पाकिस्तानच्या धर्तीवर ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरलीये. यापूर्वी हा विक्रम डॉन ब्रॅडमन आणि बिली पोनस्पोर्ड यांनी इंग्लंडविरुद्ध १९३४ मध्ये ४५१ रन्स करून केला होता. ९० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आज रूट आणि ब्रूक यांच्या जोडीने मोडला आहे.

टेस्टच्या इतिहासातील दुसरं वेगवान त्रिशतक

त्रिशतकासह हॅरी ब्रूकने अजून एक मोठा विक्रम केला आहे. यामध्ये ब्रूकने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद त्रिशतक ठोकलं आहे. हॅरी ब्रूकने 310 बॉल्समध्ये त्रिशतक पूर्ण केलं आहे. हॅरी ब्रूक 322 चेंडूत 317 रन्स करून बाद झाला. हॅरी ब्रूकने त्याच्या या तुफान खेळीमध्ये 29 चौकार आणि 3 सिक्स ठोकले आहेत.

जगातील सर्वात वेगवान त्रिशतक झळकावणारा फलंदाज वीरेंद्र सेहवाग आहे. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चेन्नईच्या टेस्ट क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने 278 चेंडूत ट्रिपल सेंच्युरी झळकावली होती. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने 304 चेंडूत 319 रन्सची खेळी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रोज प्या कढीपत्त्याचा चहा, सर्व आजार जातील पळून

Mumbai Rain : नवरात्रीत परतीच्या पावसाचा दांडिया; अचानक बरसलेल्या सरींनी नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Politics : भुजबळ-कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण, VIDEO

Health Tips: बुलेटप्रूफ कॉफी तुम्ही प्यायलात का? वाचा आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT