Harry Brook Record: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा आक्रमक युवा फलंदाज हॅरी ब्रुकच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे.
मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने निर्णायक ७२ धावांची खेळी केली. या मालिकेत धावांचा पाऊस पाडत त्याने ७८ च्या सरासरीने ३१२ धावा चोपल्या. या शानदार कामगिरीसह त्याने एमएस धोनी आणि विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत धावांचा पाऊस पाडत ३१० धावा केल्या होत्या. हा कारनामा त्याने भारतीय संघाचा कर्णधार असताना केला होता.
कर्णधार म्हणून एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे होता. आता हॅरी ब्रुकने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. हॅरी ब्रुकने इंग्लंडविरुद्ध ३१२ धावा केल्या आहेत. तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एकाच मालिकेत २८५ धावा केल्या होत्या.
हॅरी ब्रुक - ३१२ धावा
विराट कोहली- ३१० धावा
एमएस धोनी- २८५ धावा
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार, ४९ धावांनी विजय मिळवला या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३०९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २ गडी बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.