दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौरने नाडीन डि क्लार्कचा कॅछ टिपताच डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच आनंदाची लाट उसळली. हा दक्षिण आफ्रिकेचा दहावा आणि शेवटचा विकेट गेला होता. या विकेटसह महिलांच्या टीम इंडियाने 52 रन्सने आयसीसी वुमेंस वर्ल्डकप २०२५ ता अंतिम सामना जिंकला होता. या विजयासह भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं.
महिलांनी वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्या क्षणी भावना आवरणं प्रत्येकासाठी कठीण झालं होतं. तिरंग्यासोबत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यावेळी दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.
चाहत्यांनी या जोडीला भारतीय महिला क्रिकेटची ‘रो-को’ जोडी म्हटलंय. हे नाव रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीवरून घेतलं गेलंय. टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित-विराटचा तिरंग्यातील असाच एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंर आता हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाचा असाच फोटो व्हायरल झालाय.
स्टेडियममध्ये उपस्थित असलेला माजी कर्णधार रोहित शर्मा आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनीही भारतीय तिरंगा हाती घेत महिलांच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी चाहतेही फार खूश होते.
ओपनर फलंदाज प्रतिका रावल दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर टीममध्ये आलेल्या शेफाली वर्माने सांगितलं होतं की, कदाचित देवाने तिच्यासाठी काहीतरी खास योजना आखली आहे. सेमीफायनलमधील अपयश मागे टाकत तिने अंतिम सामन्यात शानदार खेळी करत आपले शब्द खरे ठरवले. दुसरीकडे, दीप्ती शर्माने संपूर्ण स्पर्धेत 22 विकेट्स घेतले आणि 200 पेक्षा जास्त रन्स करून नवा रकॉर्ड केला आहे.
या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. संपूर्ण स्टेडियम आपल्या चॅम्पियन भारतीय मुलींच्या सन्मानार्थ घोषणा देत होतं. “वंदे मातरम, माँ तुझे सलाम, और लहरा दो सरकशी का परचम लहरा दो” अशा गाण्यांच्या तालावर संपूर्ण प्रेक्षकवर्ग एकसुरात गात होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.