Harmanpreet kaur saam tv
Sports

INDW VS PAKW:हरमनप्रीत कौरकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, असा कारनामा करणारी ठरणार पहिलीच भारतीय खेळाडू

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. संघाची जबाबदारी सांभाळत ती फलंदाजीमध्ये देखील बहुमूल्य योगदान देत असते.

Saam TV News

ICC womens T20 wc Ind vs Pak आयसीसी महिला टी -२० विश्वचषक २०२३(ICC women's T20 world cup 2023) स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे.

या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी आता कर्णधार हरमनप्रीत कौरवर असणार आहे. दरम्यान तिला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

हा सामना केप टाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होईल.

हा विक्रम आपल्या नावावर करणार हरमनप्रीत कौर

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. संघाची जबाबदारी सांभाळत ती फलंदाजीमध्ये देखील बहुमूल्य योगदान देत असते. दरम्यान या स्पर्धेत तिच्याकडे एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची नामी संधी आहे.

हरमनप्रीत कौरने आतापर्यंत टी -२० क्रिकेटमध्ये २९४० धावा केल्या आहेत. जर तिने ६० धावा केल्या, तर टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी ३००० धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरेल.

महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती सध्या पाचव्या स्थानी आहे. केवळ ११ धावा करताच ती २९५० धावा करणाऱ्या सोफी डिवाइनला मागे सोडत चौथ्या स्थानी विराजमान होईल. या यादीत ३६८३ धावा करणारी सुजी बॅट्स सर्वोच्च स्थानी आहे.

पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते दोन्ही संघांनी प्लेइंग ११

भारतीय संघ : शेफाली वर्मा, जेमीमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर,ऋचा घोष (विकेटकिपर), देविका वैद्य/ शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा, रेणुका सिंग.

पाकिस्तान संघ : मुनीबा अली, जावेरिया खान, बिस्मान मारुफ (कर्णधार), निदा डार, आयशा नसीम, आलिया रियाज, ओमिमा सोहेल, फातिमा सना, एमन अनवर,तुबा हसन, सादिया इक्बाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT