नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात गुजरात टायटन्स संघ विजेता ठरला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच आयपीएल मधील संघासाठी नेतृत्व केलं. त्यानं त्याच्या गुजरात टायटन्स या संघांचं उत्तम नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये प्रथमच पदार्पण केलेल्या या संघाने आयपीएल २०२२ (IPL) जेतेपदाचा मान पटकावला. या आयएपीलच्या आधी हार्दिक पांड्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिने त्याला पाठिंबा दिला होता व त्या नंतर त्याने या टी-२० मध्ये उत्तम प्रदर्शन केलं. खास करुन गोलंदाजीमध्ये आणि आपल्या टीकाकारांना आपल्या खेळातून उत्तर दिलं. या सर्व कठीण परिस्थितीवर मात करून हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya ) आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स या संघाला चॅम्पियन बनवले. तेव्हा त्याच्या या यशामुळे त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक ही भावूक झाली व त्याला मिठी मारून रडली. नताशा आणि हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ( Hardik Pandya Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स या संघाचे ७ गडी बाद करत पराभूत केलं. तसेच राजस्थान रॉयल्सच्या १३० धावांवर विजय मिळवला. गुजरात टायटन्सच्या आयपीएलमधील पहिल्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून नवा विक्रम केला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचे पहिले कर्णधार दिवंगत शेन वॉन यांच्याप्रमाणे पहिल्या हंगामात विजयी होण्याचा मान पटकावला. गुजरात टायटन्स विजयी होताच त्याची पत्नी मैदानावर आली. त्यानंतर पतीच्या यशासाठी भावुक होऊन तिनं हार्दिकला मिठी मारली.
हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचं हे हंगाम खूप महत्त्वपूर्ण ठरलं आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्यानं टी-२०वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळं त्याला टिकाकारांना सामोरे जावं लागलं होतं. टी-२० वर्ल्ड कपनंतर तो थेट आयपीएलमध्ये उतरला होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्या खेळाकडे होते. या सर्व गोष्टी मागे सारुन त्यानं या हंगामात उत्तम फलंदाजी व गोलंदाजी केली. तसेच त्यानं अंतिम फेरीमध्ये ३ महत्त्वाचे गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.