हार्दिक पांड्या होणार टीम इंडियाचा कर्णधार ? गावस्कर म्हणाले...

भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी हार्दिक पांड्याकडे जबरदस्त कौशल्य - सुनील गावस्कर
Hardik Pandya
Hardik Pandya Saam tv
Published On

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वात (IPL 2022) नव्याने पदार्पण झालेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) गुजरात टायटन्सने जेतेपद पटकावले. हार्दिकलाही पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं हार्दिकने सोनंही करुन दाखवलं. काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या फायनल मध्ये राजस्थानला (Rajasthan Royals) पराभूत करुन गुजरातच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात जेतेपदावर नाव कोरलं. विशेष म्हणजे यंदाच्या संपूर्ण हंगामात हार्दिकने अप्रतिम नेतृत्व करत फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याच्या या चमकदार कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत असताना भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही हार्दिकवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Hardik Pandya
IPL 2022: टाटा पंच कार मिळाली तरी कोणाला?

काय म्हणाले सुनील गावस्कर ?

"गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने जबरदस्त नेतृत्व करुन सर्वांच्या तर्क वितर्कांना चुकीचं ठरवलं. पांड्याने सर्व खेळाडूंना एक टीम म्हणून खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व करण्याचे जबरदस्त गुण आहेत. जेव्हा तुमच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता असते तेव्हा राष्ट्रीय स्तरावरही नेतृत्व करण्याची संधी मिळण्याच्या शक्यता आपोआपच वाढतात. मला असं वाटतं पांड्याकडे भविष्यात टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळण्याचे कौशल्य आहे. ही गोष्ट खूपच चांगली आहे. पण मी असं नाही म्हणत की, हार्दिकच पुढचा कर्णधार असेल. परंतु, निवड समितीकडे पर्याय असणं नेहमीच चांगल असतं."

Hardik Pandya
IPL 2022: गुजरात टायटन्सला मिळाले २० कोटी; कोणाला किती मिळाले पैसे?

फलंदाजीसह गोलंदाजीतही हार्दिक चमकला

हार्दिकने दुखापती नंतर आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन केलं. त्यामुळे हार्दिकच्या फलंदाजी आणि गोलंदाजीबाबत सर्वांना शंका होती. मात्र, हार्दिकने या सर्व शंका कुशंकांना पाणी फेरत यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ३० षटकांहून अधिक गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ८ विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे मोक्याच्या क्षणी आयपीएलच्या फायनल मध्ये राजस्थान विरुद्ध हार्दिकने भेदक गोलंदाजी करुन ४ षटकांमध्ये १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. राजस्थानने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना हार्दिकने ३४ धावाही केल्या. त्याने गुजरातसाठी यंदाच्या मोसमात ४८७ धावा कुटल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com