T20 World Cup 2024 Team India  Predication
T20 World Cup 2024 Team India Predication  google
क्रीडा | IPL

T20 वर्ल्ड कपच्या संघात 'या' खेळाडूंचं तिकीट पक्क; विराट-हार्दिकचं काय होणार?

Bharat Bhaskar Jadhav

T20 World Cup 2024 Team India Predication : आयपीएलनंतर टी-20 विश्वचषक २०२४ साठी भारतीय क्रिकेट संघाची निवड केली जाईल. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नवीन खेळाडूंना वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी मेगा टूर्नामेंटमध्ये संधी मिळण्याची शक्यता नाहीये. तर काही अनुभवी क्रिकेटपटूंना निराशेचा सामना करावा लागू शकतो.

ICC ने तात्पुरत्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यासाठी 1 मे ही तारीख निश्चित केली आहे. यादरम्यान अजित आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संघातील प्रत्येक सदस्य फिट आहेत का नाही हे ठरवत स्पष्ट पर्याय निवडावे लागतील. बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'मैदानावरील कामगिरीच्या आधारे कोणताही प्रयोग किंवा निवड होणार नाही.

पीटीआयला बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयता ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, संघ निवड मैदानावरील कामिगरीच्या आधारे होणार नाहीये. भारताकडून खेळणाऱ्या आणि टी-२० आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यामुळे हे स्पष्ट होतं की, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. पण जर दोघांची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाली, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यापैकी एकालाच स्थान मिळू शकते.

दुसऱ्या यष्टिरक्षक पदाचा निर्णयावरून संघ निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन, जितेश शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे. राहुल आणि किशन वरच्या क्रमावर फलंदाजी करत आहेत आणि या आयपीएलमध्ये दोघांनीही अद्याप मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. यामुळे निवडकर्त्यांना त्यांच्या खालच्या क्रमातील कामगिरीचे विश्लेषण करणे कठीण होणार आहे. हार्दिक पांड्याचा गोलंदाजीतील फिटनेस हा चिंतेचा विषय असला तरीही त्याची निवड पक्की असल्याचं म्हटलं जात आहे. त

त्याच्याप्रमाणेच विराट कोहलीचीही निवड पक्क आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांची निवड निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे. जर हे १० खेळाडू तंदुरुस्त असतील तर ते नक्कीच अमेरिकेसाठी रवाना होतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सिराजला विश्रांती दिली आहे कारण तो सातत्यपूर्ण खेळतोय. त्याला जबाबदारीचा बोजा सांभाळण्याची गरज आहे. गिल आणि जयस्वाल या दोघांमध्ये कोणाची निवड करायचं म्हटलं गिलचं नाव पुढे येत आहे. गुजरात टायटन्सच्या कर्णधाराची जबाबदारी पार पाडणाऱ्या शुबमन गिलने जास्त धावा केल्यात.

या आधारे पाहिलं तर जयस्वालची धावसंख्या कमी दिसतेय. आयपीएलमध्ये त्याने मोठी धावसंख्या उभारली नाहीये. तरीही निवड समिती त्याला डच्चू देऊ शकत नाही. वरच्या क्रमावर खेळणाऱ्या चार खेळाडूंमध्ये तोच एकमेव डावखुरा फलंदाज आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण गिल धावा करत राहिला तर जयस्वालच्या निवडीविषयी अडचण निर्माण होईल. नाहीतर निवडकर्ते दोघांनाही संघात स्थान देऊ शकतात. त्यांच्या जागेवर शिवम आणि रिंकूपैकी एकाला संघात स्थान देऊन एकाला डच्चू मिळू शकतो. अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या तीन क्रिकेटपटूंमध्ये 'राखीव' स्पिनरच्या जागेसाठी स्पर्धा आहे.

अक्षर पटेल हा डावखुरा फिरकीपटू असला तरी तो उपयुक्त फलंदाजही आहे. तर चहल त्याच्या नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अद्याप एकही T20 विश्वचषक खेळलेला नाही, पण गोलंदाजी कौशल्यात तो इतर दोघांपेक्षा खूप सरस आहे. पण नेहमी त्याला महत्त्वाच्या स्पर्धेत डच्चू देण्यात येत असल्याने निवडी समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे बीसीसीआय मयंक यादव, हर्षित राणा, आणि आकाश माढवाल सारख्या खेळाडूंना गोलंदाज म्हणून नेणार का हे पाहावे लागेल.

टी२० वर्ल्डकपसाठी २० खेळाडूंची नावे निश्चित झालेत. यातील १५ जण संघात असतील तर ५ जण स्टँडबायवर असतील. फलंदाजीत ६ खेळाडूंची निवड होईल. यात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,रिंकू सिंह

ऑलराउंडर (४) : हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल.

यष्टीरक्षक - ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन,

जलदगती गोलंदाज- जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरण, भाजपच्या उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी बंदी

Panchayat Star Cast Fee : सचिवजी की प्रधानजी ? 'पंचायत ३'साठी सर्वाधिक मानधन कोणी घेतले?

Australia Squad: T-20 WC आधी ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल! १५ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान

FD Investment Tips: एक नंबर! तुमच्या गुंतवणुकीवर 'या ५ बँका देतील ९.६० टक्के व्याज

Satara Peacock Viral : माणसाळलेला मोर बघा! बिनधास्त पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतोय, मोबाइल कॅमेऱ्यासमोरही देतो पोझ, Video

SCROLL FOR NEXT