Hardik pandya statement on defeat against delhi capitals in dc vs mi match twitter
Sports

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

Hardik Pandya Statement On Defeat, DC vs MI, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना काय म्हणाला हार्दिक पंड्या? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा प्रवास जवळजवळ संपला आहे. ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या हा संघ नेहमी टॉप ४ मध्ये असायचा. मात्र यावेळी हा संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करू शकलेला नाही. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दिल्लीने २५७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला २४७ धावा करता आल्या.

सामन्यानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, ' हा खेळ आता आणखी रोमांचक होऊ लागला आहे. कारण यापूर्वी दोन्ही संघांमध्ये काही षटकांचं अंतर असायचं. आता काही चेंडूंचं अंतर शिल्लक राहिलं आहे. '

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी २५८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्माने ३२ चेंडूतं सर्वाधिक ६३ धावा केल्या. हार्दिक म्हणाला की, ' जर काही चुकलं असेल , तर मधल्या षटकांमध्ये रिस्क घेता येऊ शकली असती.' असं हार्दिक म्हणाला. (Hardik pandya statement)

मुंबई इंडियन्स संघाला या संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह मुंबई इंडियन्स संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन समाजावर कारवाई का करत नाही? पोलिसांनी धरपकड करताच मराठी आंदोलकांचा संतप्त सवाल|VIDEO

Local Train Video: लोकल ट्रेनमध्ये तरूणीने गायला शिवरायांचा पोवाडा; नेटकरी म्हणाले, 'संस्कार...'

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Krishna Janmashtami 2025: कृष्ण गोकुळाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा वेळ आणि महत्व

Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा, पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण; धरपकड सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT