Hardik pandya statement after win over punjab kings in pbks vs mi match amd2000 twitter
क्रीडा

Hardik Pandya Statement: 'IPL मध्ये हे होतच..' पंजाबला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

PBKS vs MI, IPL 2024: पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर काय म्हणाला कर्णधार हार्दिक पंड्या, जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत गुरुवारी (१८ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत पंजाब किंग्जवर ९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने ७ गडी बाद १९७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १८३ धावांवर आटोपला. दरम्यान या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, ' तुम्हाला नेहमी वाटेल की, तुम्ही सामन्यात अजूनही टिकून आहात. मात्र तुम्हाला माहीत आहे की, आयपीएलमध्ये हे होतच राहतं. आतापर्यंत अनेक सामन्यांचा शेवट हा असाच झाला आहे.'

पंजाब किंग्ज संघाकडून तुफान खेळी करणाऱ्या आशुतोष शर्माचं हार्दिक पंड्याने कौतुक केलं. तो म्हणाला, ' सर्वच चेंडू त्याच्या बॅटच्या मध्ये जाऊन लागत होते. मला नक्कीच त्याचा आनंद आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी टाईमआऊटच्या वेळी खेळाडूंना हेच सांगितलं की, तुम्ही सामन्यात किती पुढे आहात हे महत्वाचं नाही. तर तुम्ही सामन्यावर घट्ट पकड बनवून ठेवणं जास्त महत्वाचं आहे.'

शेवटच्या षटकांमध्ये मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी गोलंदाजी करता आली नाही. याबाबत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' आम्ही डेथ ओव्हर्समध्ये हवी तशी गोलंदाजी करू शकलो नाही. पण विजय हा शेवटी विजयच असतो. आम्हाला नक्कीच आनंद आहे.' तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करत असताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर १९२ धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला अवघ्या १८३ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

SCROLL FOR NEXT