Hardik Pandya White Wedding Saam Tv
Sports

Hardik Pandya White Wedding: हार्दिक पंड्या पुन्हा लग्न करणार; या प्रसिद्ध ठिकाणी करणार व्हाईट वेडिंग

राजस्थानमध्ये आणखी एक शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. लवकरच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे

Saam TV News

Hardik Pandya White Wedding:राजस्थानमध्ये आणखी एक शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. लवकरच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. हार्दिकने देखील विवाह करण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या उदरपूरची निवड केली आहे.

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक या दोघांनी २०१८ मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यावेळी कोरोनाकाळ असल्याने या दोघांना थाटामाटात विवाह करता आला नव्हता. हा विवाह सोहळा मोजक्याच लोकांसमोर पार पडला होता. आता ३ वर्षानंतर तो थाटामाटात 'व्हाईट वेडिंग' (White Wedding) करणार आहे.

हार्दिक पंड्या आज सकाळी आपली पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक, भाऊ कृणाल पंड्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह मुंबई एयरपोर्टवरून उदरपूरला जाण्यासाठी रवाना झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,हार्दिक पंड्या १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवाह बंधनात अडकणार आहे.

आज मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर या विवाह सोहळ्याचं ठिकाण आणि या विवाह सोहळ्याला कोण कोण हजेरी लावणार हे गुपित ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या विवाह सोहळ्याला क्रिकेटपटूंसह बॉलिवूड, बॉलिवूड स्टार्स आणि प्रसिद्ध उद्योजक हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हा शाही विवाह सोहळा उदयपूरमधील रामपूरा चौकच्या पुढे असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती आहे. या संपूर्ण सोहळ्याची तयारी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT