hardik pandya gets angry on umpire during dc vs mi ipl 2024 match video viral amd2000 twitter
Sports

Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

DC vs MI, Hardik Pandya: दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्या भडकल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला ९ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. दरम्यान दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात तो रागात असल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी सुरू असतानाचा आहे. तर झाले असे की, १० व्या षटकात अभिषेक पोरेल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आला. तो पहिला चेंडू खेळण्यासाठी भरपूर वेळ घेत होता. हे पाहून कर्णधार हार्दिक पंड्याला राग अनावर झाला. त्यानंतर त्याने जाऊन अंपायरकडे तक्रारही केली. यापूर्वी विराट कोहलीने अंपायरला जाब विचारला असता त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता हार्दिक पंड्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते.

हार्दिक पंड्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्या ट्रोल होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने अवघ्या २ षटकात ४१ धावा खर्च केल्या.

या मुंबई इंडियन्स संघाला महागात पडल्या. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला ९ गडी बाद २४७ धावा करता आल्या. मुंबईचा संघ विजयापासून १० धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT