Hardik Pandya Dance Saam tv
Sports

Hardik Pandya Dance: चॅम्पियन्स बनल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूसोबत 'कुंग फू' हार्दिक पांड्याचा भांगडा|Watch Video

Hardik Pandya Dance Video : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयानंतर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने आनंदोत्सव साजरा केला. नवज्योत सिंग सिद्धूसोबतचा डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सनी हरवून इतिहास रचला. या ट्रॉफीसाठी भारताला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. एकदिवसीय विश्वचषकात भारताने चॅम्पियन्ससारखा खेळ खेळला. परंतु शेवटच्या टप्प्यावर मात्र भारतीय संघ कमकवूत ठरला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला कोणीही रोखू शकले नाही.

भारताचा विजय होताच देशभरात जल्लोष केला गेला. या शानदार विजयानंतर भारतीय खेळाडूही आनंदात होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या भावनांना उधाण आले. दुबईमध्ये भारताने इतिहास रचल्यानंतर हार्दिक पांड्या माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूसोबत भांगडा करताना दिसला.

किवीच्या संघाने २५२ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने धमाकेदार सुरुवात करत ७६ धावा केल्या. नंतर श्रेयस अय्यरने ४८, केएल राहुलने ३४ आणि हार्दिक पंड्याने १८ धावा करून भारताला विजय मिळवून दिला. "आयसीसी स्पर्धा जिंकणे नेहमीच आश्चर्यकारक असते, विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफी. मला २०१७ हे वर्ष खूप जवळून आठवते." त्यावेळी आम्ही विजय मिळू शकलो नाही. संपूर्ण स्पर्धेत आम्ही कसे खेळलो आणि त्याचवेळी सर्वांनी कसे योगदान दिले याबद्दल आनंद झाला.

तसेच मी हुशारीने, शांत, संयमी, खेळी केली आणि योग्यवेळी संधींचा फायदा घेतला. "मला वाटतं की केएल राहुल हाच आहे. केएल राहुलमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, मला वाटत नाही की, कोणीही त्याच्या पद्धतीने चेंडू मारू शकेल. आज त्याने जे केले याचे ते एक प्रदर्शन होते," असं हार्दिकने शानदार विजयानंतर सांगितले.

निवृत्तीच्या अफवांवर काय म्हणाला रोहित शर्मा

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी चर्चा होती. परंतु रोहितने या अफवांचे खंडन केले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवल्यानंतर कर्णधार म्हणाला, "मी निवृत्ती घेणार नाही, असं म्हणत सर्व चर्चांना विराम दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT