hardik pandya confirms yuzvendra chahal and rj mahavash x (twitter)
Sports

युजवेंद्र चहल-आरजे महावशच्या डेटिंगवर हार्दिककडून शिक्कामोर्तब? पंड्याचा व्हायरल व्हिडीओ खरा की खोटा? काय आहे सत्य?

Hardik Pandya : फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याचा दावा हार्दिक पंड्याने केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खरा आहे का खोटा?

Yash Shirke

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. डिसेंबर २०२० मध्ये युजवेंद्र आणि धनश्रीचे लग्न झाले होते. जून २०२२ पासून त्यांनी वेगळे राहायला सुरुवात केली होती. परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचे म्हटले जात आहे.

घटस्फोटापूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सामना पाहण्यासाठी युजवेंद्र चहल दुबईला गेला होता. सामन्यादरम्यान त्याच्यासोबत आरजे महावश बसली होती. तेव्हापासून चहल आणि महावश यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. आता दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या हा युजवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याचे म्हणताना दिसतो.

'मी त्याला (युझी) संघर्ष करताना पाहिले आहे. आता त्याला पुन्हा हसताना पाहून मला आनंद होत आहे. महाने (आरजे महावश) त्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणली आहे. तो आनंदी आहे. मित्रा खूप समाधानी आणि आनंदी राहा. महाच्या असण्यामुळे तो जर आनंदी होत असेल, तर मी माझ्या भावासाठी खूप खुश आहे', असे हार्दिक पंड्या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसते.

चहल आणि महावश यांच्या डेटिंगची पृष्टी करणारा हार्दिक पंड्याचा हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ AI-generated असल्याचे म्हटले जात आहे. यात हार्दिकने गुजरातची जर्सी घातल्याचे दिसते. सध्या तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. खरा वाटावा असा खोटा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने लोकांची गफलत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

SCROLL FOR NEXT