Hardik-Natasha Divorce 
Sports

Hardik Pandya-Natasha: हार्दिक पंड्या आणि नताशाचा घटस्फोट; चार वर्षानंतर घेतला मोठा निर्णय

Hardik Pandya And Natasha Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला. हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर भावूक ही धक्कादायक बातमी जाहीर केली.

Bharat Jadhav

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर ही धक्कादायक बातमी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशामध्ये आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. ते दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा माध्यमांत होत्या. दरम्यान या अफवा असल्याचं म्हटलं जात होतं, परंतु आज हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपण नताशापासून विभक्त होत असल्याचं सांगितलं.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर ही धक्कादायक बातमी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशामध्ये आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. ते दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा माध्यमांत होत्या. दरम्यान या अफवा असल्याचं म्हटलं जात होतं, परंतु आज हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपण नताशापासून विभक्त होत असल्याचं सांगितलं. हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, त्यांच्या दोघांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण करत आहे. हार्दिक आणि नताशा यांनी मिळून आता वेगळे व्हायचे ठरवले आहे.

दोघांनीही आपलं नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी दोघांनीही एकमेकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. घटस्फोटाचा निर्णय खूप कठीण होता कारण त्यांनी एकत्र आनंद व्यक्त केला, चांगल्या-वाईट काळात एकमेकांना साथ दिली, ते एका कुटुंबासारखे जगलो,असंही हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा विवाह मे २०२० मध्ये झाला होता. लॉकडाऊनमध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. जुलै 2020 मध्ये दोघेही एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव अगस्त्य आहे. त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केलं होतं.

आता मुलगा अगस्त्याचं काय होणार?

नताशा आणि हार्दिक यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. पण यादरम्यान सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्यांचा मुलगा अगस्त्यचं काय होणार? यावर हार्दिक पांड्यानेही आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उत्तर दिलंय. नताशा आणि हार्दिक आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्ही दोघे मिळून मुलाचं पालन पोषण करू, असं हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

SCROLL FOR NEXT