Harbhajan Singh on Jofra Archer google
Sports

Harbhajan Singh: जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी; हरभजन सिंग वादात सापडला, आयपीएलमधून बॅन करण्याची मागणी

Harbhajan Singh Racist Comment On Jofra Archer: आयपीएल २०२५ दरम्यान, भारताचा दिग्गज ऑफ-स्पिनर हरभजन सिंगला कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी सुरू झाली आहे. हरभजन सिंगने जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्प्णी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रविवारी,आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. हरभजनने कॉमेंट्री करताना जोफ्राला 'काळी टॅक्सी' असे संबोधले. हरभजन सिंहचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हरभजनच्या या कमेंटमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. चाहत्यांनी हरभजवनर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणावरुन हरभजनला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

हरभजन सिंग काय म्हणाला?

ही घटना राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १८ व्या ओव्हरमध्ये घडली. तेव्हा हैदराबादकडून इशान किशन आणि हेनरिक क्लासेन क्रिजवर फलंदाजी करत होते आणि जोफ्रा आर्चर गोलंदाजी करण्यासाठी आला.

यादरम्यान, जेव्हा क्लासेनने आर्चरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग चौकार मारले तेव्हा हरभजन सिंग म्हणाला, 'लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर वेगाने चालते आणि इथे आर्चर साहेबांचे मीटर देखील वेगाने चालले आहे.' त्याची ही टिप्पणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या टिप्पणीमुळे लोक संतप्त झाले आहेत आणि आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्री पॅनेलमधून हरभजनला तात्काळ काढून टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. एका नेटकरीने म्हटले की,अशा टिप्पण्या लज्जास्पद आणि घृणास्पद आहेत. हरभजनला ताबडतोब कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकावे.

जोफ्रा आर्चरने आयपीएलमधील सर्वात महागडा स्पेल टाकला

आयपीएल २०२५ ची सुरुवात जोफ्रा आर्चरसाठी चांगली झाली नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने ४ ओव्हरमध्ये एकूण ७६ धावा दिल्या. आर्चरने पहिल्याच ओव्हरमध्ये २३ धावा दिल्या.तर दुसऱ्या ओव्हरमध्ये १२, तिसऱ्या ओव्हरमध्ये २२ आणि चौथ्या ओव्हरमध्ये १९ धावा देऊन हा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.

यासह, आर्चर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा लाजिरवाणा विक्रम भारतीय गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर होता. त्याने २०२४ च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्य सामन्यात ७३ धावा दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT