Sports

Virender Sehwag: 'हैं तो जाट, दिमाग से पैदल...' विरेंद्र सेहवागच्या वक्तव्याने नवा वाद; मारण्याची धमकी

Virender Sehwag Jat comment : आयपीएलशी संबंधित स्टार स्पोर्ट्सवरील एका शोमध्ये वीरेंद्र सेहवागने केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या शोदरम्यान त्याने जाट समाजाबाबत अशी टिप्पणी केली की, देशाच्या प्रत्येक भागातील जाट लोक बुद्धीमान नसतात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या आयपीएल सुरु असून क्रिकेटच्या मैदानावर वाद हे होतच असतात. मात्र आता वाद झालाय तो थेट कमेंट्री बॉक्समध्ये टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि सध्याच्या आयपीएलमध्ये कमेंटेटर म्हणून काम करतोय. यामध्येच वीरेंद्र सेहवाग वादात सापडला आहे. यावेळी वीरेंद्र सेहवागने जाट समुदायाबद्दल अशी टिप्पणी केली होती, त्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.

आयपीएलशी संबंधित स्टार स्पोर्ट्स शोमध्ये वीरेंद्र सेहवागने जाट समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्याच्याकडून माफी मागण्याची मागणी करण्यात येतेय. सेहवागने जाट समाजाबद्दल म्हटलं की, भारतातील प्रत्येक भागातील जाट डोक्याने हुशार नसतात.

काय म्हणाला नेमकं सेहवाग?

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की, "उत्तर प्रदेशातील जाट समुदायाची भाषा वेगळी आहे. यानंतर हरियाणातील जाट समुदायाची भाषा वेगळी आहे. राजस्थानातील जाट यांची भाषा वेगळी आहे... लेकिन सारे ही जाट दिमाग से पैदल होते हैं."

हे विधान केल्यानंतर वीरेंद्र सेहवाग हसायला लागतो पण सोशल मीडियावरील चाहत्यांना त्याचे विधान अजिबात आवडलं नाही. हा जाट समुदायाचा अपमान असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

वीरेंद्र सेहवाग स्वतः देखील जाट समुदायातून येतो. पण जाट समाजाबाबत त्याच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडालीये. चाहते त्याला माफी मागण्यास सांगत असून, एका युझरने लिहिलंय की, जाट तुझ्या घरात घुसून तुला मारतील.

कसं आहे सेहवागचं क्रिकेट कारकिर्द?

वीरेंद्र सेहवागच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने भारतासाठी ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर १७००० पेक्षा जास्त रन्सचा विक्रम आहे. वीरेंद्र सेहवागनेही आयपीएलमध्ये १०४ सामने खेळलेत. तो पंजाब आणि दिल्लीसाठी आयपीएल खेळला आणि एकूण २७२८ रन्स केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

Nag Panchami 2025 : नाग पंचमीच्या तारखेपासून ते पूजेची पद्धत सर्व माहिती घ्या जाणून

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT