Gurnoor Brar  
Sports

Team India: टीम इंडियाला तारण्यासाठी सराव शिबिरात आला ६ फूट ४.५ इंचाचा 'ऊंचा-पूरा' गोलंदाज; बांगलादेशला मिळणार तोडीस तोड उत्तर

Gurnoor Brar : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाने पंजाबच्या गुरनूर ब्रारचा चार दिवसीय शिबिरात समावेश केला.

Bharat Jadhav

गेल्या मागील वर्षापासून भारतीय संघात अनेक प्रयोग केले जात आहेत. मग गोलंदाजी किंवा फलंदाजीतील क्रमातील बदल म्हणा किंवा संघात नव्या खेळाडूची एंट्री. प्रशिक्षक गौतम गंभीरही असे प्रयोग करत आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश मालिकेसाठी फलंदाजांना तयार करण्यात मदत होण्यासाठी विशेष कौशल्य असलेल्या निव्वळ गोलंदाजांची निवड केली गेली आहे. या सराव शिबिरात जलदगती गोलंदाज गूरनूर ब्रारचा समावेश करण्यात आलाय.

गुरनूरने प्रथम श्रेणीचे पाच सामने खेळले आहेत. तर मागील आयपीएलच्या हंगामात तो पंजाब किंग्सचा सदस्य होता. मात्र, गुरनूरचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड चांगला नाहीये. पण २४ वर्षीय असलेला या खेळाडूची उंची सहा फूट ४.५ इंच आहे. त्याच्याकडे वेगात चेंडू टाकण्याची क्षमता आहे. रावळपिंडी येथे नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाच बळी घेणारा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या गोलंदाजीच्या ॲक्शनसाठी गुरनूरला खास सरावासाठी आणण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे नवीन चेंडूने गोलंदाजी करतात. भारत 'टर्निंग पिच'वर खेळेल याची शक्यता नाही. तर चेपॉकची खेळपट्टी अशी असू शकते जेथे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघेही असणार आहेत. त्या दोन्ही गोलंदाजांना समान मदत मिळेल. या खेळपट्टीवर चेंडूला उसळी अधिक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ उंच गोलंदाज राणाला आपल्या संघात घेतील अशी शक्यता आहे.

भारताचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी सल्ला दिलाय की, स्टार खेळाडूंना अशाप्रकरे गोलंदाजीचा सराव द्यावा. दरम्यान सराव सत्रात मुंबईचा ऑफ स्पिनर हिमांशू सिंहनेही नेटचा सराव केला. तमिळनाडूचा डावखुरा गोलंदाज एस अजीत रामनेही यावेळी सराव केला.

दुसऱ्या दिवशी नेटमध्ये सराव करतांना आकाश दीप आणि यश दयालने बुमराह आणि सिराज पेक्षा जास्तवेळा गोलंदाजीचा सराव केला. तर एका महिन्याच्या ब्रेकनंतर संघातील वरिष्ठ फलंदाज आपल्या फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशचा संघ रविवारी चेन्नईला पोहोचेल. बांगलादेशात झालेली अशात परिस्थिती पाहता येणाऱ्या पाहुण्या खेळाडूंसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नवे प्रमुख फारुख अहमद यांनी गेल्या गुरुवारी ढाका येथे पत्रकारांना सांगितले की, बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) सचिव जय शाह यांनी त्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था देण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत आचारसंहिता घोषित झाल्यानंतर आशिष शेलार मुंबईच्या दिशेने रवाना

रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

Face Care: हिवाळ्यात चेहऱ्यावर गुलाबपाणी लावावे की नाही?

थराररक! शांतपणे एका बाजूला उभा राहिला, अचानक खिशातून बंदूक काढली अन् धाडधाड विद्यार्थिनीवर गोळ्या झाडल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT