Gukesh Dommaraju saam tv
Sports

Gukesh Dommaraju: वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर गुकेशला अश्रू अनावर; बसल्याच जागी ढसाढसा रडला; Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

World Chess Championship : या ऐतिहासिक विजयानंतर गुकेशला आपले अश्रू आवरता आले नाहीत. या सामन्यानंतर गुकेशचा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

डी गुकेशने गुरुवारी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनून मोठा इतिहास रचला आहे. यावेळी गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला आणि विजेतेपद जिंकणारा पहिला तरूण खेळाडू बनला. गुकेशने वयाच्या १८ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर गुकेशला आपले अश्रू आवरता आले नाहीत. या सामन्यानंतर गुकेशचा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गुकेशने मोडला विक्रम

गुकेशने गॅरी कास्पारोवचा विक्रम मोडला. गॅरीने 1985 मध्ये एनेटोली कार्पोव्हला पराभूत करून विक्रम केला होता. त्यावेळी गॅरी कास्पारोव्ह 22 वर्षांचा होता. यानंतर आता गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी हा किताब जिंकला आहे.

चीनची बादशाहत संपली

भारताच्या डी गुकेशने विजेतेपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनचा ७.५-६.५ पॉईंट्सने पराभव केला. यासह गुकेश आता विश्वनाथन आनंदच्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारा गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर ठरलाय.

गुकेशला अश्रू अनावर

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर गुकेशला अश्रू अनावर झाले होते. जिंकल्याचा आनंद त्याच्यासाठी गगनात मावत नव्हता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारतीय त्याला शुभेच्छा देतायत.

डिंगच्या चुकीचा मिळाला फायदा

गुकेश काळ्या सोंगट्यांनी खेळत होता. डिंगला पराभूत केल्यानंतर गुकेश भावूक झाला आणि त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो जिंकला हे त्याच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. ग्रँड फायनल टायब्रेकरच्या दिशेने जाईल असं वाटत असतानाच गुकेशने डिंगच्या चुकीचा फायदा घेतला. डिंग हा गतविश्व बुद्धिबळ चॅम्पियन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT