Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad  
Sports

GT vs SRH: गुजरातनं पुन्हा हैदराबादला नमवलं; घरच्या मैदानात नाव कमावलं, पॉइंट्स टेबलवर मोठी झेप

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: आज इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ५१ व्या सामन्यात, गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबादमध्ये दोन हात झाले. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला २२५ धावांचे लक्ष्य दिलं.

Bharat Jadhav

लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने ८ षटकांत १ गडी गमावला होता. गेल्या सामन्यापासून हैदराबादची वरची फळी अपयशी होताना दिसत होती. त्यामुळे आपल्या खेळात सुधारत हैदराबाद संयमी खेळी केली. हैदराबादने आपली पहिली विकेट आठव्या षटकात ७२ धावांवर गमावली होती. तीन विकेट पर्यंत गुजरातच्या फलंदाजांनी शानदार भागीदारी केली होती. हीच खेळीमुळ गुजरात संघाने पुन्हा एकदा हैदराबाद संघाला पराभतू केलं. या विजयानंतर गुजरातचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. इम्पॅक्ट सब्सट्रेट ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मिळून २७ चेंडूत ४९ धावांची भागीदारी केली. प्रसिद्ध कृष्णाने हेडला बाद करत दोघांची भागीदारी संपुष्टात आणली. हेडने १६ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या. गुजरातच्या संघाशी तुलना केली तर गुजरातच्या सलीमावीरांनी ८७ धावांची भागादी केली होती.

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेटच्या मोबदल्यात २२४ धावा केल्या. गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांमध्ये ४१ चेंडूत ८७ धावांची सलामी भागीदारी झाली. फिरकी गोलंदाज झीशान अन्सारीने साई सुदर्शनला बाद करून ही भागीदारी मोडली. सुदर्शनने २३ चेंडूत ९ चौकारांसह ४८ धावा केल्या. सुदर्शन बाद झाल्यानंतर काही वेळातच शुबमनने २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

शुभबन गिल शतकाकडे वाटचाल करत होता, पण दुर्दैवाने त्याची ७६ धावांवर खेळी समाप्त झाली. हर्षल पटेलच्या थ्रोवर गिल धावबाद झाला. शुबमनने ३८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. शुबमन आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर जोस बटलरला अभिषेक शर्माने ६१ धावांवर झेलबाद केलं. बटलरने ३७ चेंडूंच्या खेळीत ४ षटकार आणि ३ चौकार मारले. बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. गुजरातने शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर (२१), राहुल तेवतिया (६) आणि रशीद खान (०) यांचे बळी गमावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT