GT vs RCB head to head record and pitch report gujarat titans vs royal challengers bangalore amd2000 twitter
क्रीडा

GT vs RCB,IPL 2024: बेंगळुरुसमोर गुजरातचं आव्हान! पाहा हेड टू हेड रेकॉर्ड अन् पिच रिपोर्ट

GT vs RCB Head to Head Record And Pitch Report: आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंर्स बेंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून गुजरात टायटन्सचा संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आपला दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाने ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पिच रिपोर्ट...

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी पाहिली, तर ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. इतर मैदानांवर २०० धावांचा सहज पाठलाग केला जातोय, मात्र मैदानावर १८०-१९० धावांचा देखील यशस्वी पाठलाग केला जातोय. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड..

आयपीएल स्पर्धेतील इतिहास पाहिला, तर हे दोन्ही संघ ३ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी गुजरात टायटन्स संघाने २ सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. दोन्ही संघ चौथ्यांदा आमने सामने येणार आहेत. हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ २-२ ची बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT