आयपीएल २०२५ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जने २४३ धावांचा डोंगर उभारला होता.
या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ विजयापासून केवळ ११ धावा दूर राहिला. पंजाबने धावांचा डोंगर उभारला होता. मात्र गुजरातच्या फलंदाजांनीही तोडीस तोड टक्कर दिली. पंजाबकडून फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. यादरम्यान पंजाबचा फलंदाज मार्कस स्टोईनिसने एक षटकार मारला, जो चर्चेचा विषय ठरतोय. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सलामीला आलेला प्रभसिमरन सिंग स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मिळुन संघाचा डाव सांभाळला. त्याने नाबाद ९७ धावांची खेळी केली. एका बाजूने श्रेयस अय्यर ताबडतोड फलंदाजी करत होता. तर दुसऱ्या बाजून लागोपाठ विकेट्स पडल्या. ग्लेन मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मार्कस स्टोइनिस फलंदाजीला आला. त्याने फलंदाजीला येताच चौकार आणि षटकार मारायला सुरुवात केली. या डावात फलंदाजी करत असताना १५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला.
या षटकात स्टोइनिसने एक गगनचुंबी षटकार मारला. हा चेंडू महिला पोसिलाच्या पायाला जाऊन लागला. सुरुवातीला सर्व घाबरले, पण त्यानंतर ती महिला पोलिस सुखरुप असल्याचं समजताच सर्वांना दिलासा मिळाला.
स्टोइनिसने हार्ट हिटिंग केली, पण त्याला मोठी खेळी करत आली नाही. त्याला या डावात फलंदाजी करताना १५ चेंडूत २० धावा करता आल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. या डावात शशांक सिंग आणि श्रेयस अय्यरच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर पंजाबने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४३ धावांचा डोंगर उभारला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.