Gujarat Titans Give 199 Target to Punjab Kings twitter
Sports

GT vs PBKS, IPL 2024: गिलची आतिषबाजी अन् राहुलचा फिनिशिंग टच! पंजाबसमोर विजयासाठी डोंगराइतकं आव्हान

IPL News in Marathi | Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

Gujarat Titans vs Punjab Kings Match Update:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने २० षटकअखेर १९९ धावा केल्या आहेत.

गुजरातने केल्या १९९ धावा...

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. वृद्धिमान साहा ११ धावांवर बाद करत माघारी परतला. (Cricket news in marathi)

तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या केन विलियन्सनने २२ चेंडूंचा सामना करत २६ धावांची खेळी केली. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलला आपलं शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र त्याचं शतकं ११ धावांनी हुकलं. तो ४८ चेंडूत ८९ धावा करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला चांगली साथ देत राहुल तेवतियाने ३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ८ चेंडूत २३ धावांची खेळी केली.

पंजाब किंग्ज संघाकडून गोलंदाजी करताना कगिसो रबाडाने ४ षटकात ४४ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर हरप्रीत ब्रारने ३३ धावा खर्च करत १ गडी बाद केला आणि हर्षल पटेलने देखील ४४ धावा खर्च करत १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT