GT vs MI IPL Match  X
Sports

GT vs MI IPL : मुंबईला यश मिळवून देण्यात हार्दिक अपयशी; गुजरात संघाचा ६ धावांनी विजय

GT vs MI IPL Match : नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पांड्याने गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरात टायटन्सने २० षटकांत ६ गडी गमावत १६८ धावा केल्या. गुजरात दिलेलं आव्हान पार करण्यात मुंबईचा संघ सपशेल अपयशी ठरला.

Bharat Jadhav

GT vs MI IPL Match Mumbai Indian Lost First Match :

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव झाला. हा सामना आयपीएल २०२४ चा ५वा सामना होता. या रोमहर्षक सामन्यात गुजरातच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या अवघ्या ६ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरात टायटन्सने २० षटकांत ६ गडी गमावत १६८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघ २० षटकांत ९ गडी गमावून १६२ धावाच करू शकला. (Latest News)

मुंबई इंडियन्सच्या संघाला अखेरच्या षटकात १९ धावा करायच्या होत्या. परंतु उमेश यादवने उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत मुंबईच्या संघाला धावा करू दिल्या नाहीत. यादवने हार्दिक पांड्या आणि पीयुष चावला यांना बाद करत गुजरातला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने षटकार मारला.

त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला हार्दिकच्या या फटकेबाजीमुळे मुंबईचा संघ सामना जिंकेल असं वाटत होतं परंतु उमेशने तिसऱ्या चेंडूवर हार्दिकची विकेट घेतली. त्यानंतर पीयुष चावलाने राशीद खानच्या हातात झेल देत मुंबई इंडियन्सचा सर्व आशा माळवून टाकल्या. मुंबई इंडियन्सकडून डेवाल्ड ब्रोविसने ४६ धावा केल्या तर रोहित शर्माने ४३ धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने २५ तर नमन धीर २० धावा करून बाद झाला.

टिम डेविड आणि हार्दिक पांड्याने ११-११ धावा केल्या. गुजरातकडून गोलंदाजी करताना अजमतुल्लाह ओमरजई, उमेश यादव, स्पॅसर जॉनसन आणि मोहित शर्माने २-२ विकेट घेतल्या. मुंबईच्या गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराहने ३ विकेट घेतल्या. तर गुजरातच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. साई सुदर्शनने ४५ , शुभमन गिलने ३१ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT