GT vs KKR Saam Digital
क्रीडा

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sandeep Gawade

गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होणारा सोमवारचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता, मात्र पावसामुळे नाणेफेकही होऊ शकलं नाही. गुजरात संघाने आजचा सामना जिंकला असता तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला असता, मात्र गुजरातच्या या स्वप्नांवर पावसाने पाणी फेरलं आहे. गुजरातने आतापर्यंत 13 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 7 गमावले असून 11 गुणांसह गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे कोलका नाईट रायडर्स आणि गुजरात टायटनला प्रत्येकी एक एक गुण मिळाला. प्लेऑफ्सच्या शर्यतीत राहण्यासाठी गुजरातला दोन गुणांची गरज होती, पण सामना रद्द झाल्यानंतर आता एक गुण देण्यात आला. त्यामुळे गुजरातला केवळ 13 गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे, जे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुरेसे नाहीत. आता शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफ्समध्ये आधीच स्थान मिळवलं आहे. त्याच्या खात्यात १९ गुणसह असून संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सहा संघांमध्ये स्पर्धा असणार आहे. सनरायझर्स हैदराबाद,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज,  लखनऊ सुपर जायंट्स आणि  दिल्ली कॅपिटल्स हे स्पर्धेतील संघ आहेत. सनरायझर्स हैदराबाद १४ गुणांसह आणि राजस्थान रॉयल्स १६ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, आणि लखनऊ सुपरजायंट्सचे प्रत्येकी १२ गुण आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT