IPL 2024: Gujarat Titans vs Delhi Capitals (GT vs DC Match) Pitch Report and Match Prediction
IPL 2024: Gujarat Titans vs Delhi Capitals (GT vs DC Match) Pitch Report and Match Prediction twitter
क्रीडा | IPL

GT vs DC, Pitch Report: आज गुजरात - दिल्ली भिडणार! कोण मारणार बाजी; कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या

Ankush Dhavre

Gujarat Titans vs Delhi Capitals Match Update

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या हंगामात फ्लॉप ठरत असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचा संघ हा सामना जिंकून टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार की फलंदाजांना? जाणून घ्या पिच रिपोर्ट.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ पैकी २ सामने जिंकले आहेत. ४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.

पिच रिपोर्ट..

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत या मैदानावर ३ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्टी संथ असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. या मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात तब्बल ३९९ धावा कुटल्या गेल्या.

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते. या सामन्यातही धावांचा पाऊस पाडला जाऊ शकतो. हे मैदान मोठं आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते.

कोण मारणार बाजी?

या हंगामात गुजरात टायटन्स संघाची कामगिरी तळ्यात मळ्यात राहिली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. हा सामना गुजरातच्या होमग्राऊंडवर होणार आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाचं पारडं जड राहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT