GT vs CSK Score Updates saam tv
Sports

GT vs CSK Score Updates: साई सुदर्शनची वादळी फलंदाजी! ट्रॉफी मिळवण्यासाठी चेन्नईसमोर भलंमोठं लक्ष्य

IPL 2023 Final GT vs CSK: आजच्या सामन्यात विजय मिळवून गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर चेन्नईही पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सशी बरोबरी करू शकते.

Chandrakant Jagtap

GT Vs CSK Final, IPL 2023 : IPL 2023 चा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. पावसामुळे रविवारी रद्द झालेला हा सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजारतने साई सुदर्शनचा वादळी खेळीच्या जोरावर चेन्नईसमोर विजयासाठी 215 धावांचे लक्ष ठेवले. आजच्या सामन्यात विजय मिळवून गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर चेन्नईही पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सशी बरोबरी करू शकते. (IPL 2023 Final GT vs CSK)

क्वालिफायर-2 मध्ये मुंबईविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिलने आजच्या सामन्यातही गुजरातली शानदार सुरुवात करून दिली. परंतु मोठी खेळी करण्यात त्याला यश आलं नाही. 20 चेंडू 39 धावा करून तो बाद झाला. शुभमन गिल बाद झाल्यानंतर ऋद्धिमान साहाने साई सुदर्शनसोबत आघाडी घेत अर्धशतक पूर्ण केले. 39 चेंडूत 54 धावा करून साहाही बाद झाला. (GT Vs CSK Final)

त्यानंतर साई सुदर्शनने मैदानावर आलेल्या हार्दिक पाड्यासोबत मिळून जोरदार फटकेबाजी केली. आता साई सुदर्शन शतक पूर्ण करणार असे वाटत असताना पथिराणाच्या चेंडूवर तो बाद झाला. साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावांची वादळी खेळी खेळली. हार्दिक पांड्याने देखील 12 चेंडूत 21 धावा केल्या. गुजरातने निर्धारित 20 षटकता 214 धावा केल्या. (Latest Sports News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT