Virat Kohli Gifts Jersey To Babar Azam instagram
Sports

IND vs PAK: मोठ्या मनाचा विराट! सामन्यानंतर बाबरला दिलं खास गिफ्ट

Virat Kohli Gifts Jersey To Babar Azam: या सामन्यानंतर विराटने बाबर आझमला खास गिफ्ट दिलं आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Gifts Jersey To Babar Azam:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहली पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला खास भेट देताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विराटकडून बाबरला खास भेट..

भारत - पाकिस्तान सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांसोबत गप्पा मारत होते. दरम्यान विराट कोहली आणि बाबर आझम देखील एकमेकांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होते. त्यानंतर विराटने बाबर आझमला भारतीय संघाची जर्सी भेट म्हणून दिली. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

भारतीय संघाने जिंकला सामना..

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १९१ धावांवर संपुष्टात आला . या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून शुभमन गिलने १६ धावांची खेळी केली. तर विराटने १६ आणि श्रेयस अय्यरने ५३ धावांची खेळी केली .कर्णधार रोहित शर्मा या सामन्याचा हिरो ठरला. त्याने ८६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

पाकिस्तानने दिलं होतं १९१ धावांचं आव्हान..

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिजवान ४९ धावा करत माघारी परतला. सलामीला आलेल्या इमाम उल हकने ३६ धावांची खेळी केली. तर अब्दुल्ला शफिकने २० धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT