Good news for team india SuryaKumar yadav came back on field in mi vs DC match amd2000 saam tv news
Sports

Suryakumar Yadav Comeback: टीम इंडियासाठी गुड न्यूज! टी -२० वर्ल्डकपपूर्वी विस्फोटक फलंदाज मैदानात उतरला

ICC T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Comeback News:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघात काही बदल करण्यात आले होते. मुंबई इंडियन्स संघातून डेवाल्ड ब्रेविस,नमन धीर आणि रसिख सलामला बाहेर केलं आणि सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं. रोमारीयो शेफर्ड आणि मोहम्मद नबीला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं.

सूर्यकुमार यादवचं कमबॅक..

गेले काही महिने संघाबाहेर असलेल्या सूर्यकुमार यादवने या सामन्यातून कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील केली गेली होती. आता काही क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिल्यानंतर अखेर तो परतला आहे. या दुखापतीमुळे तो सुरुवातीचे ३ सामने खेळू शकला नव्हता. (Cricket news in marathi)

आयपीएल २०२३ स्पर्धेत धावांचा पाऊस..

सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२३ स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजांवर हल्लाबोल केला होता. स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये त्याने ६०५ धावा केल्या होत्या. दमदार खेळ करत त्याने संघाला प्लेऑफमध्ये पोहचवलं होतं. मात्र एलिमीनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी..

सूर्यकुमार यादवचं कमबॅक ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे. कारण आयपीएल झाल्यानंतर भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप खेळायचा आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव अतिशय महत्वाचा फलंदाज असणार आहे. सध्या टी -२० क्रमवारीत तो अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT