team india saam tv
Sports

Shubman Gill: टीम इंडियाला दिलासा! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी स्टार फलंदाज फॉर्ममध्ये परतला; झळकावलं शतक

Shubman Gill Scored Century In Ranji Trophy: भारतीय संघातील स्टार फलंदाज शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघातील स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

दरम्यान भारतीय खेळाडूंचा फॉर्म हा चर्चेचा विषय ठरतोय. रोहितपासून ते जयस्वाल सर्वच फ्लॉप ठरले. तर सकारात्मक बाब म्हणजे, भारताचा टॉप ऑर्डरचा फलंदाज शुभमन गिल चमकला आहे. पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतल्यानंतर गिलने दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी केली आहे.

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल मुंबईकडून तर शुभमन गिल पंजाबकडून रणजी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला. पंजाबचा सामना कर्नाटकविरुद्ध पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात पंजाबचा संघ अवघ्या ५५ धावांवर आटोपला.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्नाटकने ४७५ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात गिलने फलंदाजी करताना शानदार शतकी खेळी केली. मात्र ही खेळी पंजाबला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसी नव्हती. पंजाबने हा सामना २०७ धावांनी गमावला.

गिलने या डावात फलंदाजी करताना, १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. त्याची मोठ्या खेळीच्या दिशेने वाटचाल सुरु होती, मात्र श्रेयस गोपाळने त्याला १०२ धावांवर पायचित करत माघारी धाडलं. पंजाबने हा सामना गमावला असला तरीदेखील, गिलचं शतक हे भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे.

कारण बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत गिलची बॅटही शांतच राहिली होती. गिलसह भारतीय संघातील इतर फलंदाजही पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता.

गिलसह रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजासारखे दिग्गज खेळाडूही कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र गिलला वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ही भारतीय संघासाठी अतिशय चिंता वाढवणारी बाब आहे.

रणजी ट्रॉफीतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. तिसऱ्या फेरीतील सामन्यांना येत्या ३० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यान विराट कोहली दिल्लीकडून खेळणार असल्याच म्हटलं जात आहे. विराट मानेच्या दुखण्याने त्रस्त आहे. आता तो रणजी ट्रॉफीत कमबॅक करणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

SCROLL FOR NEXT