good news for team india ahead of t20 world cup 2024 rohit sharma shows consistancy in t20 cricket amd2000 twitter
Sports

Rohit Sharma: यंदा वर्ल्डकप आपलाच! रोहित शर्माची गेल्या ७ सामन्यातील शानदार आकडेवारी एकदा पाहाच

Rohit Sharma Record In Last 7 T2OI Innings: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना मुंबईचा राजा रोहित शर्माने चेन्नईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. या डावात त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.

Ankush Dhavre

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना मुंबईचा राजा रोहित शर्माने चेन्नईच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रोहित शर्मा असाच काहीसा सामना पाहायला मिळाला. ज्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्स संघातील इतर फलंदाज फलंदाजीत फ्लॉप ठरले. त्याच खेळपट्टीवर रोहितने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली.

मात्र संघातील इतर कुठल्याही खेळाडूची साथ न मिळाल्याने मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीदेखील भारतीय संघाच्या फॅन्ससाठी दिलासा देणारी बाब समोर येत आहे.

रोहित शर्माचा शानदार फॉर्म..

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप खेळायचा आहे.या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. दरम्यान सलामीला फलंदाजीला येऊन तो चांगली सुरुवातही करुन देऊ शकतो.

आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये २६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतकी खेळी केली आहे. तर टी-२० क्रिकेटमधील गेल्या ७ डावात त्याने २ शतकं झळकावली आहेत. नुकताच चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद १०५ धावांची खेळी केली आहे. तर गेल्या ६ डावात त्याने ३८,४९,०,२६,४३ आणि नाबाद १२१ धावांची खेळी केली आहे. त्याची ही शानदार कामगिरी पाहता नक्कीच रोहित टी-२० वर्ल्डकपमध्येही धावांचा पाऊस पाडणार अशी चिन्ह दिसून येत आहे.

शतकी खेळीसह मोडले रेकॉर्ड्स...

रोहितने या शतकी खेळीदरम्यान २ मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार पूर्ण केले आहेत. या डावातील तिसरा षटकार मारताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार पूर्ण केले आहेत. दरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये ५०० षटकार मारणारा तो आशियातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यासह ५ धावा करताच त्याच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT