team india twitter
क्रीडा

Mohammed Shami: टीम इंडियासाठी गुड न्यूज! स्टार गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज

Ankush Dhavre

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत गोलंदाजीत हिरो ठरला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर तो भारतीय संघातून बाहेर पडला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय संघात कमबॅक करु शकलेला नाही. दरम्यान त्याच्या कमबॅकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Mohammed Shami)

सप्टेंबरमध्ये होणार मोहम्मद शमीचं कमबॅक

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमी येत्या सप्टेंबर महिन्यात कमबॅक करु शकतो. येत्या सप्टेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. असं म्हटलं जात आहे की, मोहम्मद शमी या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

मात्र त्याला संघात कमबॅक करण्यापूर्वी स्वत:ची फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. जर तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला, तर तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोहम्मद शमी दिलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते की, जे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. ते पूर्णपणे फिट होण्याची प्रतीक्षा आहे. मोहम्मद शमीने मैदानात उतरुन सराव करायला सुरुवात केली आहे.

मोहम्मद शमीची कारकिर्द

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्याने ६४ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत २२९ गडी बाद केले आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत १०१ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९५ गडी बाद केले आहेत. त्याला वनडे क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याची संधी आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २३ सामन्यांमध्ये १२७ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT