Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Pakistan News: पाकिस्तानात इमरान खान यांच्या समर्थकांनावर सुरक्षा दलाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?
Pakistan FiringSaam Tv
Published On

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये संसद परिसरात सुरक्षा दलाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (PTI) समर्थकांनी त्यांच्या नेत्याची तुरुंगातून सुटका आणि न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी इस्लामाबादमध्ये जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने सुरक्षा दलाने त्यांना नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार केला, असं सांगण्यात येत आहे.

यावेळी सुरक्षा दलाने आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, सर्व महामार्ग बंद केले. तसेच मोबाइल सेवा ब्लॅक करून केली आणि कलम 144 लागू केलं. पीटीआयने दावा केला आहे की, रेंजर्सच्या जवानांनी इस्लामाबादमधील केपी हाऊसमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि केपीचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांना अटक केली.

पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?
PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

यातच इमरान खान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना त्यांच्या समर्थकांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ''मला माझ्या सर्व लोकांचा अभिमान आहे. विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. काल बाहेर आल्यावर तुम्ही चांगलं धैर्य दाखवलं आणि सगळ्या अडथळ्यांवर मात करत डी चौकाकडे वाटचाल सुरू ठेवली.''

ते पुढे म्हणाले की, ''फॅसिस्ट सरकारच्या गोळीबारात तुम्ही झगडत राहिलात, कंटेनर, खोदलेला महामार्ग आणि तिथे लावलेले लोखंडी खिळे पार करत तुम्ही पुढे जात राहिलात. महिला, वृद्ध तसेच तरुणांनी अथक ताकद आणि संयम दाखवला.''

पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?
Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

दरम्यान, इमरान खान यांनी समर्थकांना आवाहन करताना म्हटलं आहे की, ''मी सर्वांना आवाहन करतो की, डी चौकाकडे वाटचाल करत राहा आणि अली अमीन यांच्या ताफ्यात सामील व्हा. मला विशेषतः केपी, उत्तर पंजाब आणि इस्लामाबादमधील लोकांचे कौतुक करायचे आहे. तुमच्या दृढनिश्चयाने तुम्ही गोळीबार आणि सगळ्या अडथळ्यांवर मात केली आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com