Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

PM Narendra Modi : महाविकास आघाडीचे लोकं विकासाला रोखणारे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

एकीकडे काम पूर्ण करणारी महायुती सरकार आहे, तर दुसरीकडे विकासाला रोखणारे महाविकास आघाडीचे लोक आहेत. महाविकासआघाडीने ते महाविकास विरोधी लोक आहेत असं आपल्या ट्रॅक रेकॉर्डवरून सिद्ध केलंय. अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मविआवर केली आहे.

ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात आपल्या भाषणावेळी मोदींनी कॉंग्रेस आणि मविआवर टीकांची झोड केलेली दिसली आहे. विरोधी पक्षाकडून सतत विकासकयामत अडथळा आणला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीने अटलसेतूचा विरोध केला होता. मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठप्प करण्याचा कट रचला. ते सत्तेत असेपर्यंत बुलेट ट्रेनला पुढे सरकू दिले नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागातील पाण्याशी संबंधित प्रकल्पही सोडले नाही. जे काम महाराष्ट्राच्या जनतेची तहाण भागवण्यासाठी सुरू झाले होते, ते काम महाविकास आघाडीने ते कामही अडवून ठेवले होते. ते सर्वकाम अडवून ठेवत होते. आता तुम्हाला त्यांना अडवायचे आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या या शत्रूना सत्तेबाहेरच अडवायचे आहे. शेकडो मैल दूर ठेवायचे आहे, असं देखील मोदींनी म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com