Glenn Maxwell twitter
Sports

Glenn Maxwell: नाद नाद नादच! ग्लेन मॅक्सवेलने ठोकलं वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक

Fastest Century In ODI World Cup History: या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Glenn Maxwell Fastest Century In World Cup:

दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २४ वा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने . धावांचा डोंगर उभारला.

दरम्यान डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीनंतर ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने या डावात अवघ्या ४० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केलं. यासह त्याने एडेन मार्करमचा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

ग्लेन मॅक्सवेलचं ऐतिहासिक शतक..

या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल नेदरलँडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटक अखेर ८ गडी बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला. तर नेदरलँडला विजयासाठी ४०० धावांचं आव्हान दिलं आहे.

मार्करमला मागे सोडत बनला नंबर १..

वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात हे सर्वात जलद शतक ठरलं आहे. ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या ४० चेंडूत हे शतक पूर्ण केलं आहे. १९ दिवसांपूर्वीच याच वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एडेन मार्करमने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले होतं. त्याने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं होतं.

एडेन मार्करमने केव्हिन ओ ब्रायांचा रेकॉर्ड मोडत इतिहास घडवला होता. आयर्लंडचा फलंदाज केव्हिन ओ ब्रायनने २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ५९ चेंडूत ११३ धावा चौपट इतिहासाला गवसणी घातली होती.

ग्लेन मॅक्सवेलने यापूर्वी २०१५ वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात ५१ चेंडूत ११३ धावा केल्या होत्या. तर वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने ६६ चेंडूत १६२ धावांची खेळी केली होती.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने ९३ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने ५१ चेंडूत १०२ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT