Glenn Maxwell Injury twitter
Sports

AUS vs AFG: विक्रमी खेळी करणाऱ्या मॅक्सवेलने वाढवलं ऑस्ट्रेलियाचं टेन्शन; समोर आलं मोठं कारण

Glenn Maxwell Injury: या सामन्यात विजय मिळवूनही ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

Ankush Dhavre

Glenn Maxwell Injury:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने विक्रमी खेळी केली.

धावांचा पाठलाग करताना त्याने २०१ धावांची तुफानी खेळी केली. यासह तो धावांचा पाठलाग करताना शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

फलंदाजी करत असताना त्याला क्रॅम्प येत असतानाही मैदानावर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या खेळीला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी असं देखील म्हटलं आहे. (Latest sports updates)

ग्लेन मॅक्सवेलच्या दुखापतीने वाढवलं टेन्शन..

ग्लेन मॅक्सवेलला या खेळीदरम्यान क्रॅम्प येत होते. मात्र तरीही वानखेडेच्या मैदानावर मॅक्सवेल केवळ अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसोबतच नव्हे तर आपल्या वेदनेसोबतही लढत होता. वेदना होत असतानाही तो अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. गेल्या सामन्यात त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं. दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळणार की नाही याबाबत शंका होती.

या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पुढील बांगलादेशविरुद्ध होणार आहे. ग्लेन मॅक्सवेल या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्णधार पॅट कमिन्सने म्हटलं आहे की, ग्लेन मॅक्सवेल पुढील सामन्यापर्यंत पूर्णपणे फिट होईल. मात्र ग्लेन मॅक्सवेलची दुखापत गंभीर असेल तर ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ होऊ शकते.

ऑस्ट्रेलियाचा जोरदार विजय..

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद २९१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अवघ्या ९१ धावांवर ऑस्ट्रेलियाने ७ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेलने मिळून २०२ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या डावात नाबाद २०१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

SCROLL FOR NEXT