gautam gambhir head coach saam tv
Sports

Team India New Head Coach: ठरलं! गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा नवा हेड कोच; या दिवशी होणार घोषणा

Gautam Gambhir, Team India Head Coach: बीसीसीआयने गौतम गंभीरची भारतीय संघाचा हेड कोच म्हणून निवड केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी खेळाडू भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होणार आहे. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही राहुल द्रविड यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असणार आहे. दरम्यान दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली जाणार आहे.

या वृत्तानुसार, बीसीसीआयने गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. मात्र अधिकृत घोषणा योग्य वेळ आल्यावर केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. गंभीरने बीसीसीआयकडे सपोर्ट स्टाफची मागणी केली आहे. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असून, विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत . (Gautam gambhir news in marathi)

गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी त्याने कुठल्याही संघाला प्रशिक्षण दिलेलं नाही. मात्र गेल्या ३ वर्षांपासून तो आयपीएल स्पर्धेत मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतोय. २०२२ आणि २०२३ या २ वर्षी त्याने लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. तर २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. याच वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने जाहीरात प्रसिद्ध केली होती. या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी अर्ज केले होते. ज्या महेला जयवर्धने, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पॉन्टींगसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. असं म्हटलं जात होतं की, पुढचा मुख्य प्रशिक्षक हा परदेशी खेळाडू असेल, मात्र बीसीसीआयने भारतीय दिग्गजावर विश्वास दाखवला आहे. मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गौतम गंभीर भारतीय संघाविरुद्ध झिम्बाब्वे दौऱ्यावर जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT