gautam gambhir saam tv
क्रीडा

Team India Coach: बॉलिंग कोच म्हणून गौतम गंभीरने दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गजाचं सुचवलं नाव; वाचा आहे तरी कोण?

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेटमध्ये गंभीर पर्व सुरु झालं आहे.आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविडऐवजी गौतम गंभीरची नेमणूक करण्यात आली आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडताना दिसून येणार आहे.मात्र त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोणाचा समावेश असेल हे समजू शकलेलं नाही.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्कल हवा आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी मोठी आणि महत्वाची अट म्हणजे, त्याला सपोर्ट स्टाफ स्वताहून निवडण्याचे हक्क हवे होते.

ही जबाबदारी मिळताच त्याने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विनय कुमारच्या नावाची शिफारस केली होती. बीसीसीआयने अभिषेक नायरबाबत काही शंका उपस्थित केलेली नाही. मात्र विनय कुमारला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची मागणी बीसीसीआयने फेटाळून लावल्याचे म्हटले जात आहे.

विनय कुमारच्या नावाची चर्चा सुरु असताना, आता क्रिकबझने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, गौतम गंभीरला मॉर्ने मॉर्कल गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून हवा आहे. गौतम गंभीरने आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्यावेळी मॉर्ने मॉर्कल हा या संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता. दरम्यान बीसीसीय काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात विक्रम राठोड, टी दिलीप आणि पारस म्हाम्ब्रे हे प्रशिक्षकांच्या भूमिकेत होते. मात्र आता राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या प्रशिक्षकांचाही कार्यकाळ संपला आहे. गौतम गंभीरला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जॉन्टी रोड्स हवा होता. मात्र बीसीसीआयला परदेशी प्रशिक्षक नको आहे. त्यामुळे टी दिलीप पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसून येऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन

Maharashtra News Live Updates: वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे याचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Nashik Tourist Places : अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

Womens T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या

Samsung Galaxy F05: वा! एक नंबर; दूरवरचा फोटोही येईल खास; स्वस्तातील स्टायलिश मोबाईल फोन लॉन्च

SCROLL FOR NEXT